Sub-Divisional Police Officer Nyomi Satam Madam's bold action against sand smugglers
अशा गुप्त खबरेवरुन मा.नयोमी साटम मॅडम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा यांनी मा.मुकम्मा सुदर्शन सा, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा.रिना जनबंधु मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रे. पोउपनि विलास बल्की, पोहवा धनराज गेडाम, पोलीस अंमलदार विठठ्ल काकडे,प भाउराव हेपट, रमेश कार्लेवाड, महेश गावतुरे, यांचेसह ग्राम येवती येथील वेणा नदिच्या, मारोती देवघाटवर जाउन कारवाई केली असता, १) विशाल मारोती बदकल, रा. मांढेळी, २) गजानन विठठ्ल येडमे, रा.वंदली ३) भोला आत्राम, रा.बोरी ४) लंकेश चंपतराव बदकल, रा.येवती ५) ओमप्रकाश साहु ६) विकासकुमार, ७) गज्जु मांगरूडकर रा. नागरी हे येवती येथील वेणा नदिच्या, मारोतीदेव घाटतुन, अवैद्यरीत्या रेती उत्खनन करून, जे.सी.बी.च्या साहयाने, दोन हायवा व एक ट्रॅक्टर मध्ये, भरत असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून ०२ हायवा, १ ट्रॅक्टर, जे.सी.बी.,०५ मोबाईल, व ८, ब्रास रेती असा एकुण १,०६,१५,००० रू.चा मुदद्देमाल जप्त केला. आरोपी विरूध्द कलम-३७९,३४ भादवि, सहकलम-४८ महाराष्ट्र महसुल अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.
0 comments:
Post a Comment