Ads

गावठी दारू विरोधात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

(जावेद शेख)भद्रावती तालुका प्रतिनिधी:-लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक यावर सक्त कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक १९/०३/२०२४ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग वरोरा व त्यांच्या पथकाने बरांज तांडा भद्रावती येथील जंगलात ओढ्याच्या काठी सुरु असलेल्या गावठी दारू अवैधरीत्या गाळण्याच्या भट्टीवर धडक कारवाई करून सदरची अवैध हातभट्टी उध्वस्त केली.
Excise department strike action against village liquor
सदर कारवाईत ४०० लिटर सडवा व ५० लिटर तयार दारू व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच बरांज तांडा ते भद्रावती रोडवर मनोरा गावाजवळ दुचाकी वाहनावरून अवैध गावठी दारूची वाहतूक करतांना नामे राजेश फुल्लू माडोत या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३० लिटर गावठी दारू व ज्युपिटर कंपनीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. वरील दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमालाची किंमत रुपये ६९,८००/- एवढी आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक आढळून आल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या कार्यालायचे कार्यक्षेत्रात रात्रीची गस्त घालून अशा प्रकारचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येत आहेत.

वरील कारवाई ही या विभागाचे अधीक्षक श्री. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, रा. उ. शु., वरोरा, श्री. सचिन एच. पोलेवार, दु. निरीक्षक, श्री. प्रमोद राजोते, दु. निरीक्षक, श्री. जगदीश मस्के, जवान, श्री. जितेंद्र आनंद, जवान, श्री. अमोल भोयर, जवान व श्री. विलास महाकुलकर, जवाननि वाहनचालक यांनी पार पाडली.

सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्री. विकास बी. थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा हे करीत
आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment