भद्रावती तालुका प्रतिनिधि (जावेद शेख):- पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. ०८/०३/२४ रोजी गोपनीय माहीतीगार याचेकडुन माहीती मिळाली की, ट्रक क्र.एम.एच.३२ ए.के.५७८६ मध्ये अवैध गोवंश तस्करी करूण नागपूर कडून हैद्राबाद कडे जाणार आहे.
Warora police arrested a truck driver who smuggled illegal cattle
या माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप यांनी रत्नमाला चौक वरोरा येथे सापळा रचुन ट्रक क्र.एम.एच.३२ए.के.५७८६ ला थांबवून झडती घेतली असता ५३ नग बैल की.अं.१०,६०,००० रू व ट्रक असा एकून ३०,६०,००० रू चा मुददेमाल ट्रक चालक झनकलाल मरकाम रा. मध्यप्रदेश व धिरज रेडडी रा. नागपूर यांचेवर कार्यवाही केली.
सदरची कारवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. सहा पोलीस अधिक्षक नाओमी साटम उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सपोनि योगेद्रसिंग यादव, पोहवा दिलीप सुर, दिपक दुधे यांनी पार पाडली.
0 comments:
Post a Comment