वरोरा (प्रती):-वरोरा येथील गजानन मेडिकलचे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील दशरथ सातपुते यांची राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल संघटनेच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे नेतृत्वात सुनील सातपुते यांची वैद्यकीय सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .
आ. शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेल च्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रामधील सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व पक्ष संघटन मजबुतीने पक्षाची उभारणी करणे याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद जीवतोडे वरोरा शहर अध्यक्ष बंडू भोंगाळे उपस्थित होते
सुनील सातपुते यांच्या नियुक्ती बाबत सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत असुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेंमूर्डे वरोरा तालुका अध्यक्षअविनाश ढेगळे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
0 comments:
Post a Comment