Ads

अवैध्यरित्या वाहतुक करीत असलेली नगदी २४,७५,०००/-रू. रोकड जप्त

चंद्रपुर :-दि. 07/03/2024 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, बल्लारशा कडून चंद्रपूरकडे एक व्यक्ति दुचाकीवर काळ्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेवून येणार आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांनी स.पो.नि. हर्षल एकरे, पो.उपनि.विनोद मुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो. कॉ संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे याचे पथक कारवाई करीता नेमून यांना आदेशीत केले.
24,75,000/-in cash in illegal circulation Cash seized
सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे बल्लारशा रोडवरील विसापूर टोलनाक्या समोरील वळणार साफळा रचला असता खबरे प्रमाणे दुचाकीवर एक युवक पाठीवर बॅग लटकवून दुचाकीवर येतांना दिसता त्यास थांबवून त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे वय 34वर्षे व्यवसाय आयुर्वेदीक शॉप रा.112 ईडब्युएस नंदनवन सदभावना नगर प्लॉट नं. 112 नागपूर असे सांगीतले त्यास थांबविण्याचे कारण सांगून आमची पोलीस असल्याची ओळख करून देवून त्यास आमचे ओळखपत्र दाखवून त्याचे जवळील काळया रंगाचे कॉलेज बॅगची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे बॅगमध्ये नोटाचे बंडल दिसून आले ते पचासमक्ष बॅगमधुन काढून पाहणी केली असता 1) 22,26,000/- रु.ज्यात 500/-रु.च्या 4652 नोटा 2) 1,49,000/-रु. ज्यात 200/-रु.च्या 745 नोटा असा एकूण 24,75,000/-रू नगदी रक्कम मिळून आली. एवढया मोठया प्रमाणात नगदी रोकड मिळून आली सदर रोकड त्याने चोरी किंवा अवैध्य मार्गान प्राप्त केली असा आमचा संशय असल्याने कलम 41 (1) (ड) दं.प्र.स. अन्वये सदर रोकड ताब्यात घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि. हर्षल एकरे, पो.उपनि.विनोद मुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना. पो. कॉ. संतोष यलपुलवार, पो. कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे नदतीने केली असुन सदर रोकड बाबतचा तपास पो उपनि विनोद भुरले, स्था गुशा चंद्रपूर हे करीत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment