भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :- तालुक्यातील धानोली गावालगत असलेल्या पाखराबाई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन दिवसीय पाखराबाई जत्रेचे आयोजन करण्यात आले. या जत्रेचा समारोप दहीहंडी तथा महाप्रसादाचे वितरण करून पार पडला. या जत्रेनिमित्त येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. Pakhrabai fair organized at Vitthal Rukmini temple in Dhanoli
सदर जत्रा ही तालुक्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या जत्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा सदर मंदिरात जत्रेच्या पहिल्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा महाअभिषेक करण्यात आला. या दोन दिवसात मंदिरात कीर्तन, भजन तथा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या जत्रेदरम्यान दोन दिवस मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. सदर जत्रा बघण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली. तथा विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. दहीहंडी, गोपालकाला व महाप्रसादाने सदर यात्रेची सांगता करण्यात आली. सदर जत्रा शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 comments:
Post a Comment