भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-बरांज येथील एम्टा कोळसा खाण Emta Coal Mine परिसरात गेल्या 65 दिवसापासून बरांज येथील महिला प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील दहा प्रकल्पग्रस्त महिला अद्यापही खान परिसरात असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरलेल्या आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिनांक 13 रोज मंगळवार ला दुपारी चार वाजता उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या उपस्थितीत कंपनी अधिकारी व प्रकल्पग्रस्त महिलांची बैठक बोलवण्यात आली. मात्र आधी कोळसा खान बंद करून मागण्या पूर्ण करा असा पवित्र प्रकल्पग्रस्त महिलांनी रेटून घेतल्याने ही बैठक अखेर निषफळ ठरली.
The meeting of the project victims was fruitless.
Protest of women project victims in Baranj since 65 days
दरम्यान प्रकल्पग्रस्त महिला अद्यापही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सदर बैठकीत प्रकल्पग्रस्त महिला व एम्टा कोळसा खान कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्त महिलांच्या मागण्यांचा प्रस्ताव कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असल्याचे येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले व आंदोलन मागे घेण्याची प्रकल्पग्रस्तांना विनंती केली. मात्र दोन महिन्यांपासून याबाबत प्रयत्न केला नाही असा सवाल प्रकल्पग्रस्त महिलांनी उपस्थित करून आधी कोळसा खान बंद करून मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती पावले उचला असा पवित्रा बैठकीत सहभागी महिलांनी घेतला. कंपनी अधिकाऱ्यांच्या कोणत्याही आश्वासनाला महिलांनी दाद दिली नसल्याने अखेर सदर बैठक निष्फळ ठरुन या बैठकीत तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केपीसीएल व कर्नाटक कंपनी चा पूर्ण पाडा वाचून दाखवला तरीपण कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही.जोपर्यंत पूर्ण मागण्या मार्गी लागत नाही,तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त महिलांनी यावेळी व्यक्त केला.सदर बैठकीला उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, खान कंपनीचे अधिकारी आलम शेख,जिभकाटे, पुनवटकर,पुनर्वसन अधिकारी, तथा विस ते पंचेविस प्रकल्पग्रस्त महिला उपस्थित होत्या. सदर बैठक निष्फळ ठरल्याने कंपणी व प्रशासनासमोरील पेच चांगलाच वाढला आहे.
0 comments:
Post a Comment