भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ ज्ञानेश हटवार यांची "मराठी भाषा गौरव दिनानिमित्त" "On Marathi Language Glory Day" आकाशवाणी वरून आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे.
२७ फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक, साहित्यिक व पत्रकार क्षेत्रात सक्रिय असलेले मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ ज्ञानेश हटवार भद्रावती यांची मुलाखत आकाशवाणीवरून उद्या दिनांक २७ फेब्रुवारीला २०२४ ला सकाळी ११ वाजता प्रसारित होणार आहे.
0 comments:
Post a Comment