जिवती :-चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे मागील महिन्यात 07 डीसेंबर 2023 ते 15 डिसेंबर 2023 पर्यंत 9 दिवसाचे अन्नत्याग आमरण उपोषण जिवती तालुका भूमिहीन शेतकरी संघर्ष समिती तर्फे केले होते.
Jivati Taluka is the home of problems
त्या अनुषंगाने मा. पालकमंत्री महोदय व जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांनी झालेल्या बैठकीत चर्चे नुसार विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते,तात्काळ सहा महिन्याकरिता संयुक्त मोजणीच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी मा. दीपक वजाळे यांची नियुक्ती करण्याचे बैठकीत मंत्री महोदयाच्या उपस्थितीत ठरले असताना अजून पर्यंत त्याची नियुक्ती झालेली नाही, तसेच वारसाण फेरफार सुरु केलेले नाही,तसेच जातीचे दाखले पण देणे सुरु केले नाही, जिवती येथील नवीन ग्रामीण रुग्णालय सुरु केले नाही व अन्य मागण्यासंदर्भात कोणतेही निर्णय घेतले जात नाही त्यामुळे जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन आपण गांभीर्यपूर्ण लक्ष घालून समस्या तात्काळ मार्गी लावावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर तालुक्यातील जनतेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीचे नेते सुग्रीव गोतावळे,सुदाम राठोड,शबीर जहागीरदार,विजय गोतावळे,लक्ष्मण मंगाम, मुकेश चव्हाण, विनोद पवार, दयानंद राठोड, प्रेम चव्हाण यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
0 comments:
Post a Comment