Ads

एका जखमी चितळाचा मृत्यू.

(प्रशांत गेडाम)नागभीड- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटातील हस्तानपूर गावालगत आज दि.8/2/2024 ला सकाळचा दरम्यान एक जखमी चितळ एका शेतात असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्याची माहिती तात्काळ स्वाब संस्थेला देण्यात आली. माहिती मिळतात स्वाब संस्थेने वन विभागाला माहिती देऊन घटनास्थळी भेट दिली त्यावेळेस जखमी अवस्थेत असलेला नर चितळाचा हा उपचारापूर्वीच काही वेळातच मृत्यू झाला.
यावेळी माने क्षेत्र सहाय्यक तळोधी बाळापुर , मेकेवार वनरक्षक आलेवाही बीट यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. करून तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये बनाईत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शव विच्छेदन केले व नंतर चितळाला जाळण्यात आले.
यावेळी अरूप कन्नमवार वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी बा, राजेंद्र भरने वनरक्षक तळोधी, यश कायरकर अध्यक्ष स्वाब संस्था, सदस्य व वन मजूर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment