Ads

जांब येथिल खोट्या तक्रार कर्त्यावर सरपंच सह गावकऱ्यांची तक्रार..Complaint of sarpanch and villagers against false complainant in Jamb..

घाटंजी - तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल असलेल्या जांब ग्राम पंचायतीमध्ये विद्यमान सरपंच रमेश सिडाम यांना गावातील नत्थु भिमा वेट्टी यांनी तुम्ही मला पैसे देत जा नाहीतर मी तुमच्या खोट्या तक्रारी करून फसविन तथा गाव विकास कामात अडथळा निर्माण करेन अश्या प्राप्त धमक्यांना वैतागून सरपंच रमेश सिडाम यांचे सह ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देवून खोट्या तक्रार कर्त्यावर फौजदारी सह उचित कारवाई करण्याची मागणी केली आहे.Complaint of sarpanch and villagers against false complainant in Jamb..
        सन २०१८ ते २०२० या कालावधीत गैरअर्जदार नत्थु भिमा वेट्टी यांच्या गटाचे सरपंच होते यावेळेस गैरअर्जदार यांनी ग्राम पंचायतीच्या विविध निधीत हस्तक्षेप करून मोठा भ्रष्टाचार केला यात काही नगदी तर दिनांक २७/५/२०१९ ला चेक क्रमांक ७३५९३५ द्वारे रुपये ४००० उचल केल्याचे दप्तरी नोंद आहे याशिवाय तत्कालीन सरपंचा यांचा मुलगा यांच्या जवळ कोणतेही कंत्राटदाराचे लायसन नसताना अवाजवी अशी रक्कम उचल केलेली आहे . यात दिनांक १२/१०/२०१८ ला चेक क्रमांक ७५७०१ मध्ये रुपये ७५०० उचल केलेली असून असे एक ना अनेक  प्रकारचा निधी कोणतेही विकास कामे न करता उचल केल्याचे तक्रारीत नमूद असून या कालावधीत जांब येथिलच सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद सय्यद अमिर यांनी वरिष्ठांकडे अनेक तक्रारी सुद्धा केल्याचे नमूद आहे.मात्र अश्यातच तत्कालीन सरपंच यांना सय्यद जावेद यांच्या तक्रारीवरून पायउतार व्हावे लागले. यात गैर अर्जदार यांची चांगलीच आर्थिक गोची झाली. त्यानंतर ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यात त्यांनी निवडणूक लढविली मात्र ते स्वतःच्या हिताचे हित जोपासत असल्याने गाव विकास खुंटेल ही धारणा गावातील नागरिकांत असल्याने त्यांना जनतेनी नाकारले यात त्यांचा पराभव झाला. व ग्राम पंचायतीत सरपंच म्हणून रमेश सिडाम विराजमान होताच गैरअर्जदार यांनी माजी सरपंच राजेंद्र मडावी व विद्यमान सरपंच यांना मला ग्राम पंचायतीचे टक्केवारी द्या नाहीतर मी माजी सरपंच व हुशार व्यक्ती आहे. तुमच्या खोट्या तक्रारी करून फौजदारी दाखल करायला लावतो.यात हा ग्राम पंचायतचा निधी शासनाचा व गाव विकास साठी असतो यात आमचा कोणताच अधिकार नाही.आम्ही काहीच भ्रष्टाचार केला नसतांना तुम्हाला कशाचे पैसे देवू असे म्हटले असता त्यांनी तुमची तक्रार केली आहे . चॅनलला तुमच्या बातम्या येत आहे.आता तुम्हाला तक्रार थांबायची असेल व चॅनलच्या बातम्या थांबवायचे असेल तर एक पत्रकार  सुद्धा पैसे मागतो आहे.असे दोघांचे मिळून १ लाख रुपयांची मागणी केली. या साऱ्या बाबीला आम्ही विरोध केल्याने विद्यमान सरपंच रमेश सिडाम हे जांब ग्राम पंचायत मध्ये पेसा चे कधीच अध्यक्ष नसतांना त्यांना अध्यक्ष असल्याचे दाखवून मोठा भ्रष्टाचार केल्याची खोटी तक्रार केल्याचे चॅनलच्या बातमी वरून समजले असून गैरअर्जदार नत्थु वेट्टी स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे मागतो व गाव विकासात अडथळा निर्माण करीत असल्याने त्यांचेवर व ज्यांचेसाठी पैसे मागतो असे खोट्या बातम्या प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी दाखल करून उचित कारवाई करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,ग्राम विकास मंत्री,सचिव,अमरावती विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,तहसीलदार ,गट विकास अधिकारी यांचे सह ठाणेदार पारवा पोलीस स्टेशन यांचे कडे सादर करून सन २०१८ पासून ग्राम पंचायत जांब ची सविस्तर बाब निहाय चौकशी करून तत्कालीन सरपंच यांचेवर सुद्धा कारवाई करावी व खोट्या तक्रार कर्त्याचा होणारा नाहक त्रास दूर करावेत असे निवेदात नमूद करीत एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment