राजुरा : अ.भा.क्रां. नारायणसिंह उईके संघर्ष समिती चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने राजुरा येथे रविवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात चौथी उलगुलानवेध चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीत ‘आदिवासींचे अस्तित्व व अस्मितेचे भवितव्य : वर्तमान संदर्भात’ या विषयावर विचारवंत, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते विचारमंथन करणार आहेत.
प्रसिद्ध विचारवंत व ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि.स. जोग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. बोली भाषांचे अभ्यासक राजेश मडावी हे अध्यक्षस्थान भूषवतील. स्वागताध्यक्ष डॉ. विठ्ठल आत्राम तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अ.भा.क्रां. नारायणसिंह उईके संघर्ष समितीचे संस्थापक प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. विनायक तुमराम, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, वासुदेव शेडमाके, आंबेडकरी विचारवंत डॉ. गजानन लोहवे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय लाटेलवार, डॉ. मृदुला रायपुरे-जांगडेकर, नागपूरचे प्रा. प्रदीप हिरापुरे, आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष संतोष आत्राम व कवी नरेशकुमार बोरीकर, विचारवंत राजेंद्र कुळमेथे, प्रा. महेश गेडाम उपस्थित राहतील. चौथ्या उलगुलानवेध चिंतन बैठकीची भूमिका समितीचे केंद्रीय सचिव व लेखक सुनील कुमरे मांडणार आहेत. कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अ.भा.क्रां. नारायणसिंह उईके संघर्ष समितीने केले आहे.
0 comments:
Post a Comment