भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती तालुक्यातील गुळगाव लगतच्या एका नाल्यातून अवैध रेती तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत एक ट्रॅक्टर व एक कार असा 9 लाख 2500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे Bhadravati police action against tractors smuggling illegal sand.
याप्रकरणी चालक तथा मालक असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनांक 21 रोज बुधवार ला सदर नाल्यावर रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर नंबर नसलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर अवैधरीत्या रेती भरताना आढळून आले. या ट्रॅक्टरच्या मागे टेहाळणी करणारी एम एच 34 सि डी 5702 या क्रमांकाची बलेनो कार होती. ही दोन्ही वाहने जप्त करून आरोपी चालक मयूर हरी भोयर,मालक मारोती वामन गायकवाड व रामेश्वर मारोती गायकवाड तिघेही राहणार वायगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप आष्टनकर, निकेश ढेंगे, जगदीश झाडे व विश्वनाथ चुदरी यांनी केली.
0 comments:
Post a Comment