चंद्रपूर : ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) (एआयएमआयएम) चंद्रपूर शाखेच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी जाहीरसभा तसेच महापक्ष प्रवेश सोहळा घुटकाला वार्डातील नेहरू हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला एआयएमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे जिल्हाउपाध्यक्ष सय्यद अमान अहमद यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनाही निमंत्रीत करण्यात आले आहे. यासोबतच पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, प्रदेश महासचिव अब्दूल नजीम, विदर्भ अध्यक्ष शाहिद रंगूनवाला, प्रदेश महिला अध्यक्ष कीर्ती डांेगरे, नागपूर जिल्हा प्रभारी निसार सिद्धिकी आदींची उपस्थिती राहणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्ह्यातील विविध समुदायातील हजारो नागरिक पक्षात प्रवेश करणार असल्याचे अमान अहमद यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष अजहर शेख, महासचिव जाकीर शेख, शहर सचिव रकीब शेख आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment