तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-
सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली रोटरी क्लब भद्रावती तर्फे गरीब, होतकरू अशा विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी हालाकिच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलचे सहाय्य केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असे सांगितले.Smiles on the faces of the students as they received their bicycles.. Anil Dhanorkar
डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर आशा वेणुगोपाल मॅडम यांच्या संकल्पनेतून उडाण या प्रकल्पा अंतर्गत रोटरी क्लब भद्रावती तर्फे शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष अनिल धानोरकर, सुधीर पारधी, विक्रांत बीसेन, डॉ माला प्रेमचंद, डॉ ज्ञानेश हटवार, सुनील पोटदुखे, किशोर खंडाळकर, किशोर भोसकर, अविनाश सिद्दमशेट्टीवार, विवेक आकोजवार, प्रकाश पिंपळकर, भिश्वाचार्य बोरकुटे, रुकसाना शेख , नामदेव खारकर , युवराज धानोरकर, महेंद्र गावंडे, आनंद क्षीरसागर, मनोहर नागपुरे आदी रोटरियन उपस्थित होते. या प्रसंगी डॉ ज्ञानेश हटवार यांनी रोटरी क्लब भद्रावतीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.
रोटरी क्लब भद्रावती तर्फे विविध शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थी जे पायपीट करत शाळेत येतात, अशा निवडक विद्यार्थ्यांची यादी शाळेमार्फत मागवून घेतली. त्या यादीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वास्तविक परिस्थितीची शहानिशा करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. रोटरी क्लब भद्रावतीने निश्चित केलेल्या निवड होतकरू विद्यार्थ्यांना संपर्क साधून ही आनंदाची बातमी त्यांना देण्यात आली. आज दिनांक २७ डिसेंबर २०२३ ला भद्रावती येथील आंबेडकर चौक येथे सायकल वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मान्यवर रोटरियन यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्बास अजानी यांनी केले.
यावेळी समस्त रोटरियन , विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment