Ads

जबरन चोरी करणाऱ्या विधी संघर्ष बालकाल व आरोपींना भद्रावती पोलिसांनी घेतले ताब्यात

तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-
भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत एक विधी संघर्ष बालक व त्याच्या दोन साथीदारांनी एका इसमास निर्जन ठिकाणी नेऊन केली लूटपाट.
Bhadravati police took two accused of forced theft and legal conflict child into custody
प्राप्त माहितीनुसार भद्रावती 24/12/2023 रोजी फिर्यादी दिनेश कुंडलिक कोलटकर, वय 36 वर्ष रा. पंचशील नगर, डोलारा तलाव, भद्रावती याने पो स्टे ला येऊन तक्रार दिली की, फिर्यदीचे घराचे बांधकाम करणे असल्याने तो घराचे वरील टिन पत्रा आणनेसाठी दि. 24/12/2023 चे 14.30 वा. चे दरम्यान घरून आईचे जवळून 29000/- रू. घेऊन गेला असता त्यास बाजारात विधीसंघर्षग्रस्त बालक वय 16 वर्षे, रा. पंचशील नगर डोलारा तलाव भद्रावती हा भेटला असता दोघांनी बियर बार मध्ये दारू पिली व दारूचे बिल देत असताना विधीसंघर्षग्रस्त बालक याने फी. चे जवळील पैसे पहिले नंतर 18.00 वा. चे दरम्यान आरोपी याने फिर्यादीला फुकट नगर मधून मला पैसे घ्यायचे सोबत चल असे बोलून चे मोटार सायकल ने फुकट नगर कडे गेले. विधीसंगर्षग्रस्त बालकाने कोलटकर च्या मोटार सायकल फुकट नगर ते केसुरली कडे जाणाऱ्या रोडने मोटार सायकल नेऊन निर्जन ठिकाणी झाडाखाली मोटारसायकल थाबविली फिर्यादी हा खाली बसून फोन वर बोलत असताना आरोपी 1. रोहित जगदीश पाल, वय 25 वर्षे, व्यवसाय - मजुरी, रा. हनुमान नगर भद्रावती, 2. समिक्ष संजय बारेकर, वय 24 वर्षे,रा. हनुमान नगर भद्रावती, 3. मॉन्टी गेडाम, रा. सुमठणा तिन्ही आरोपी हे फिर्यादी चे पाठीमागून येऊन फिर्यादी चे डोक्यावर काळा कपडा टाकून पाठीवर लाथ मारली. फिर्यादी हे उबडे पडले असता त्याचे मागील खिशातून नगद 29000 रू तसेच खिशातील मोबाईल, हातातील अंगुठी व पाकीट असा एकूण 51500 रु. चा माल जबरीने हिसकावून चोरून पळून गेले. अशा तक्रारी वरून पोलिस स्टेशन भद्रावती अप. क्र. 703/23 कलम 392,34 भा. द वी. प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आरोपी क्र. 01 आणि 02 यांना अटक केली असून वि स बा यास पालकाचे ताब्यात देण्यात आले. अटक आरोपी चा पी.सी.आर घेऊन व आरोपी क्र. 03 यास अटक करून अधिक तपास करण्याची तजवीज ठेवली आहे. 

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment