राजुरा :बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथील शिक्षक व विध्यार्थीनी मिळून स्वच्छता पंधरवाडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून"एक तारीख-एक तास " "One Date-One Hour" स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. Swachhta fortnight-Swachhta is a service in Adarsh School.
राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर, क्रीडा मार्गदर्शक बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) चे विध्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट, राष्ट्रमाता जिजाऊ गाईड युनिट चे व इतर शालेय विध्यार्थी,शिक्षकांनी मिळून स्वच्छता अभियान राबविले. यावेळी शालेय परिसराच्या बाजूला, रस्त्यावर रोज रात्रौ ला दारुडे दारू पिऊन काचेच्या बॉटल्स फोडून ठेवतात व मोठ्या प्रमाणात कचरा करून अस्वच्छता पसरून ठेवतात. त्यामुळे विध्यार्थी नी परिसर स्वच्छ करताना या दारूडयाना भावनिक आवाहन केले. दादा दारू पिऊ नका, आम्हच्या शाळेचा परिसर अस्वच्छ करू नका, दारूच्या बॉटल्स फोडू नका, पशु पक्षी व विध्यार्थी ना इजा करू नका असे आवाहन सुद्धा केले. पोलीस प्रशासनाने या परिसरात रात्रौ ला गस्त घालून या हुल्लळखोर दारूडयाच्या मूसक्या आवराव्या अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, मुख्यध्यापक सारिपुत्र जांभूळकर, स्काऊट मास्तर रुपेश चिडे, गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, जयश्री धोटे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, नवनाथ बुटले, विकास बावणे, प्रशांत रागीट, मेघा वाढई,आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, सातपुते, रणदिवे आदींनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment