Ads

ना. धर्मरावराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वृद्धांना ब्लँकेट भेट .

चंद्रपूर :- राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसा निमित्त चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज चंद्रपुरातील डेब्यू सावली वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. On the occasion of Dharma Rao Atram's birthday, NCP gave blankets to the elderly
डेब्यू सावली वृद्धाश्रम हे जिल्ह्यातील विख्यात वृद्धाश्रम असुन वृद्धांच्या सेवेकरिता अतिशय सेवाभावी आहे. या सेवेत खारीचा वाटा का होईना या हेतुने धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी येणारा हिवाळा लक्षात घेता ब्लैंकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात धर्मराव आत्राम यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्याकरिता प्रार्थना करीत वृद्धाश्रमातील जेष्ठ आजोबांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. त्यानंतर नितीन भटारकर, राजीव कक्कड, सुनील काळे, सुजित उपरे यांच्या हस्ते उपस्थित वृद्धांना ब्लैंकेट, फळ व बिस्कीटांचे वाटप करन्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, जेष्ठ नेते मनोज काच्छेला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, रायुकॉं शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अभिनव देशपांडे, माजी सरपंच अमोल ठाकरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, उपाध्यक्ष तिमोटी बंडावार, संजय खेवले, रोशन फुलझेले, कामगार सेलचे उपाध्यक्ष संजय सेजूळ, गणेश बावणे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, भोजराज शर्मा, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, आकाश बंडीवार, पियुष चांदेकर, अमर गोमासे, संदीप बिसेन, विशाल मंगर, पवन जाधव, मनोज सोनी, राहुल भगत, निलेश टोंगे, राहुल वाघ, केतन जोरगेवार, राजकुमार खोब्रागडे, उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment