भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथे दि.१५/१०/२०२३ ला ग्रा.पं. जि.प.शाळा, अंगणवाडी,आरोग्य विभाग चंदनखेडा यांचे संयुक्त विद्यमाने "वाचन प्रेरणा दिन "Reading Inspiration Day" व " जागतीक हातधुवा दिन" "World Hand Wash Day" निमित्त प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी मा.नयन जांभुळे सरपंच,मा.अनिलजी कोकुडे अध्यक्ष शा.व्य.समिती,मा.अनिता आईंचवार मुख्याध्यापीका, मा.कवडुजी बोढे ह्या मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला
अंगणवाडी स्वयंसेविका राखीताई मुडेवार,वैशाली ढोक,यांनी हात धुण्याच्या सहा टप्प्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांद्वारा सोबत स्वतः करुन दाखविले.
यावेळी मा.नयन जांभुळे सरपंच यांनी स्वच्छतेच्या सवयी आपले जिवनमान उंचावण्यासाठी कारणीभुत ठरत असतात म्हणून प्रत्येक बालकांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी स्वतःपासून सुरवात करावी व हा दिवस घराघरातून रोजचा उपक्रम बनावा असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.अनिल कोकुडे,मा.अनिता आईंचवार यांनी "वाचन प्रेरणा दिन" यावर वाचनाचे महत्व पटवून दिले.वाचनालयातील पुस्तकाचे नियमित वाचन करण्यासाठी आवाहन केले.डाँ.ए.पि.जे.अब्दुल कलाम यांचे जिवनातील महत्वाचे प्रेरणादायी टप्पे शाळेचे शिक्षक पंडीत लोंढे यांनी आपल्या सुत्रसंचनासोबत विद्यार्थ्यांना सांगुन वाचना विषयी प्रेरीत केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.वेदिका निखार या विद्यार्थीनीने केले.
एकूणच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्यातून कार्यक्रम पार पडला.
0 comments:
Post a Comment