भद्रावती तालुका प्रतिनिधी:- मानवी जीवनामध्ये खिलाडी वृत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. या खिलाडी वृत्तीमुळे माणसे जोडता येतात व ही खिलाडी वृत्ती निर्माण होण्यासाठी विविध क्रीडा प्रकार हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन निलजर्ई उपक्षेत्रीय प्रबंधक प्रतापसिंह पवार यांनी व्यक्त केले .सुंदर नगर येथे वेकोली वनी क्षेत्राचे महाप्रबंधक आबास चंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनात आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
Sports competitions are important for sportsmanship in life- Sub district manager Pratap Singh Pawar.
यावेळी विजय मालवी, प्रमोद वंजारी, विकास सोनटक्के, गोकुल येदुलवार, एस एम ठाकरे, सुभाष भोगेकर, मनोज बिट्टूरवार, बंडू खंडारे, मधुकर झोडे, प्रदीप विश्वकर्मा ,भारत जीवने, तातावार आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचा पहिला सामना पैनगंगा उपशेत्र व निलजर्ई उपक्षेत्रामध्ये खेळल्या गेला. सादर स्पर्धेत वनी वेकोली क्षेत्रातील मृगोली, घुगुस, पैनगंगा, निलजई व सी डब्ल्यू एस ताडाळी मुख्यालय आदी संघाने सहभाग घेतला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंगोली संघाने निलजर्ई संघावर एक शून्याने मात करीत विजेतेपद पटकाविले तर निलजई संघ हा उपविजेता ठरला. स्पर्धेचे पंच म्हणून राजीक अहमद, प्रकाश निषाद व करण निषाद यांनी काम पाहिले .विजेत्या संघांना बक्षिसाचे वितरण निलजई उपशेत्रीय प्रबंधक प्रताप सिंह पवार यांचे शुभ असते करण्यात आले यावेळी जिया उल्लाखान ,डी .पी पाटील, अर्जुनकर आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनी क्षेत्राचे स्पोर्ट कमिटी सचिव अजय पाटील यांनी तर संचालन व आभार कार्मिक प्रबंधक विनोद पाटील यांनी मानले .सदर स्पर्धेचा लाभ वनी क्षेत्रातील सर्व कामगारांनी घेतला. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता राजेंद्र जाधव, प्रशांत डोये, संजय ठाकरे, प्रफुल इखारे ,सुनील बिपटे ,मुकेश गायकी आदींनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment