Ads

हुकूमशाही भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख :-देशात आणि राज्यात महागाईने कहर केला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. देशात लोकशाहीची पायमल्ली होऊन देश हुकूमशाहीच्या वाटेने जात आहे. ईडीचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणल्या जात आहे.वाढत्या बेरोजगारीने बेरोजगार युवक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना जीवन जगणे असह्य झाले आहे. समाजाला धर्माच्या नावावर तोडण्याचे प्रयत्न होत आहे. अशा या केंद्रातील व राज्यातील हुकूमशाही भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचा व लोकशाहीचे रक्षण करा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.Pull down the authoritarian BJP government from power: Congress state president Nana Patole.
जिल्ह्यात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला आनंदवन चौकातून सुरुवात झाल्यानंतर सदर यात्रा ही भद्रावती येथे पोहोचली. त्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एक भव्य जाहीर सभा घेण्यात आली, दीप प्रज्वलित करण्यात आल्या यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबोले आमदार सुभाष धोटे , नगराध्यक्ष अनिल धानोरकर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राम तिवारी सोहेल रजा सुधीर मुळेवार धनंजय गुंडावार विनोद दत्तात्रय, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुरज गावंडे, प्रशांत भारती, तालुकाध्यक्ष प्रशांत काळे सरपंच नवीन जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जनसंवाद यात्रा शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारात आल्यानंतर भद्रावती शहर तथा तालुका काँग्रेस तर्फे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचल्यानंतर तेथे या यात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सदर जनसंवाद यात्रेचे तालुक्यात कुचना, नागलोन, पाटाळा, माजरी व कोंढा येथे भव्य स्वागत करण्यात आले. या सर्व ठिकाणी यात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment