Ads

होऊ द्या चर्चा !” अभियानातून जनतेच्या मतांचा अनादर करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा भांडाफोड करा : रविंद्र शिंदे

भद्रावती : केंद्र व राज्य शासनाकडून जनतेच्या मतांचा सतत अनादर होत आहे. देशात व राज्यात सध्या जनकल्याणकारी कामे कमी परंतु घोषणाबाजी अधीक अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी दिसून येत आहे. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षांतर्गत येत्या गणेश चतूर्थीच्या शुभ पर्वावर“ होऊ द्या चर्चा ! ” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून जनतेच्या मतांचा अनादर करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा ठिकठिकाणी जावून भांडाफोड करा. असे आवाहन पक्षाचे वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.Let the discussion happen!” Disrespect the central and state governments who disrespect the people's opinions through the campaign: Ravindra Shinde*
भद्रावती तालुक्यात ग्रामीण व शहरी क्षेत्रात “ होऊ द्या चर्चा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आज दि. १६ सप्टेंबर रोज शनिवार रोजी स्थानिक श्री मंगल कार्यालयात शिवसेना ( उ. बा. ठा. ) पदाधिकारी, युवा व युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक बंधू भगिनिंची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकिच्या अध्यक्षस्थानावरुन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
या बैठकीत जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, वरोरा-भद्रावती विधानसभा सघंटक वैभव डहाने ,विधानसभा समन्वयक मगेश भोयर ,भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, , तालुका युवा अधिकारी राहुल मालेकर, उपजिल्हा महीला सघंटीका माया नारळे , भद्रावती तालुका संघटीका अश्लेषा जिवतोडे भोयर , भद्रावती शहर संघटीका माया टेकाम, शहर समन्वयक भावना खोब्रागडे, उपतालुका सघंटीका शिला आगलावे , माजरी शहर प्रमुख रवि रॉय, मुधोलीचे सरपंच बंडू पा. नन्नावरे, माजी सैनिक विजय तेलरांधे, कॅप्टन विलास देठे, शिव गुडमल ,रवि भोगे , रोहण कुटेमाटे, विश्वास कोंगरे व प्रशांत कारेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी रविंद्र शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ? दाऊद आणि माल्याला फरफटत आणले का ? गंगा नदी स्वच्छ झाली का ? देशातील शहरे स्मार्ट झाली का ? काश्मिरी पंडित सुरक्षीत घरी परतले का ? मराठा समाजाला आरक्षण दिले का ? धनगर समाजाला आरक्षण दिले का ? ओबीसी समाजाच्या न्याय हक्क मागणीचे काय झाले ? गुगल बरोबर आठशे रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय देण्याचा साडे चार लाख कोटीचा करार केला .परंतु शेतकऱ्यांच्या शेत पिकांना हमीभावासाठी मदत का केली नाही ? मुख्यमंत्री योगी म्हणतात , उत्तर प्रदेशात ६३ गरीब बालकांचा मृत्यु ऑक्सीजनच्या तुटवड्याने नाही. तर अस्वच्छतेमुळे झाला. मग स्वच्छ भारत अभियानाचे काय झाले ?.जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नये . म्हणून सांगतात परंतू तिकडे केंद्र सरकार मात्र चिनी कंपन्याना ठेके देत आहे. गरीबी, मंहागाई व बेरोजगारी कमी झाली काय ? होऊ द्या चर्चा अभियानातून असे विविध प्रश्न जनतेच्या दरबारात उपस्थित करून मतदारांना बोलके करा. असे प्रतिपादन सुध्दा रविंद्र शिंदे यांनी यावेळी केले..
याप्रसंगी भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांनी प्रास्ताविकातून " चला होऊ द्या !” चर्चा अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. नर्मदा बोरेकर, घनश्याम आस्वले,ज्ञानेश्वर डूकरे, भास्कर ताजने आणि बंडू पा. नन्नावरे यांनी आपल्या भाषणातून सदर अभियान राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मंगेश भोयर यांनी केले. या प्रसंगी भद्रावती तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, शिवसैनिक फार मोठया संख्येत उपस्थित होते. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली. येत्या १८ सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता वरोरा येथे ' शिवालय ' ह्या मध्यवर्ती कार्यालयात दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment