Ads

अभियंत्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून देशाला समृद्ध बनविण्याची क्षमता - आ. किशोर जोरगेवार The ability of engineers to make the country prosperous by developing new technologies - MLA Kishore Jorgewar

चंद्रपुर :-आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. वैज्ञानिकता आणि अभियांत्रिकी म्हणजे आपल्या समाजाच्या समृद्धीची मार्गदर्शक दिशा आहे. अभियंत्यांनी देशाला प्रगत करणारे अनेक वास्तू, वाहणे, मशनरी तयार केल्या आहेत. अशाच प्रकारे नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून देशाला समृद्ध करण्याची क्षमता अभियंत्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
The ability of engineers to make the country prosperous by developing new technologies -MLA Kishore Jorgewar
आज चंद्रपूर - गडचिरोली इरिगेशनल कंत्राटदार संघटनेच्या वतीने अभियंता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजी काळे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजी. मुकेश टांगले, मृद व जिल्हा संलसंधारण अधिकारी इंजि. नीलिमा मंडपे, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता इंजी. प्रकाश गायकवाड, लघू पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजी. प्रविण झोड, नागपूर चे जिल्हा जलसंधारण अधिकारी इंजी. श्रीकांत मस्कावार, गडचिरोलीचे जिल्हा जलसंधारण अधिकारी इंजी. पंढरी इंगोले, लघू पाठपंधारे विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपूरक चंद्रपूर - गडचिरोली इरिगेशनल कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष इंद्रकुमार उके, मार्गदर्शक सुभाष कासनगोट्टुवार, वसंतकुमार सिंग, राजू गोलीवार, उपाध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, सचिव परवेज सौदागर आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, अभियंत्यांची देशाला गरज आहे. देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. बदल्या काळा बरोबर तंत्रज्ञानही बदलत गेले आहे. अभियंत्यांच्या कल्पनेतून हे शक्य झाले आहे. चंद्रपूर जिल्हात विविध मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या अभियंत्यांवरही मोठी जबाबदारी आहे. आपण नव्या तंत्रज्ञाणाच्या मदतीने येथील विकास कामे गतीशील व दर्जेदार केली पाहिजे. येथील प्रदुषनावर तोडगा काढण्यासाठीही आता अभियंत्यांनी पूढाकार घेतला पाहिजे असे यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण आपल्या देशाचा विकास करू शकतो. आपण नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून देशाला समृद्ध बनवू शकतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी काम करावे. आपल्या देशाला एक विकसित देश बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. अभियांत्रिकी ही एक अत्यंत महत्त्वाची अभिवृद्धी क्षेत्र आहे. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विकासामुळे प्रत्येक देश विकसित होत असतो. त्या विकासासाठी अभियंता हे पद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. सध्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास शक्य झालेला असल्याचेही यावेळी बोलताना ते म्हणाले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उकृष्ट कार्यकारी अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. सुनिल कुंभे यांना पुरस्कार प्रदाण करण्यात आला. या कार्यक्रमाला अभियंता व अभियांत्रीकी शिक्षण घेत असलेल्या भावी अभियंत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment