मूल प्रतिनिधी: मूल तालुक्यातील ताडाळा येथील शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. सूर्यभान टिकले (५५) रा. चिचाळा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
55-year-old farmer killed in tiger attack
सकाळी सात वाजताच्या सुमारास सूर्यभान हा आपल्या शेतात पाहणी गेला असता दबा धरून बसलेल्या एका वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना गावात माहिती होताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती
वनविभागाला ही माहिती देण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात वाघ मनुष्य संघर्ष वाढला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार केल्याच्या घटना वारंवार घडत असून वन्य प्राण्यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.गावात दहशतीच वातावरण आहे.
0 comments:
Post a Comment