घाटंजी (तालुका प्रतिनिधी) : भारताच्या सिमेचे रक्षण करणारे माजी सैनिक यांना शि प्र म माध्यमिक् विद्यालय घाटंजी येथील शेकडो विद्यार्थिनीनी राख्या बांधून त्यांच्या कार्याचा सम्मान केला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याद्यापक फिरोज पठाण तर घाटंजी परिसरातील माजी सैनिक उपस्थिती होतेA student of Higher Secondary School, Ghatji, tied a rakhi to celebrate ex-servicemen
भारतीय स्वतंत्रता चा अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने रक्षाबंधन चा कार्यक्रम घेण्यात आला
देशाच्या सिमेचे संरक्षण करणारे युद्धा मध्ये लढणारे माजी सैनिक यांच्या कार्याचे देशासाठी मोठे महत्व आहे त्यामुळे रक्षाबंधन च्या पवित्र सणांच्या दिवशी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवाना शाळेच्या विद्यार्थिनीनी स्वतः च्या हातानी तयार केलेल्या राख्या बांधल्या यावेळी सर्व माजी सैनिक भारावून गेले होते यावेळी माजी सैनिक श्रीराम गुल्हाने यांनी व् मेजर तुलसीदास आत्राम् यांनी सर्व विद्यार्थ्याना सीमेवर लढत असतांना व् कार्य बद्दल माहिती सांगितली देशसेवा करण्यासाठी सेन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन केले
यावेळी मेजर तुलसीदास आत्राम् , माजी सैनिक उत्तमराव अंड्रस्कार, श्रीराम गुल्हाने,मधुकर भगत, मोतीराम कुलसंगे,दामोधर नेवारे,बाबाराव गावंडे,शंकर कनाके, प्रमोद चौधरी, किरण वाढई
हे मंचावर उपस्थीत होते
मागील वर्षी सुद्धा रक्षाबंधनला २० माजी सैनिक यांच्या समवेत रक्षाबंधन केले होते शाळेत दरवर्षी माजी सैनिका समवेत रक्षाबधंन करण्याचे शाळेनी ठरविले आहे
कार्यक्रम यशस्वी यावेळी प्रशांत उगले, डी के मस्के मनोज बुरांडे , संदीप गोडे,महेश वाघाड़े,संदीप नखाते, अनूप मानकर, कु प्रफुल्ला गुल्हाने, सी सी पंधरे,विनोद ठाकरे, या शिक्षकानी मार्गदर्शन केले
0 comments:
Post a Comment