Ads

घरात आढळलेल्या नागा सर्पमित्रांनी दिले जीवदान.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख : पहाटेच्या वेळेस एका कामगाराच्या घरात आढळलेल्या एका पाच फूट नागाला सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून त्याला जीवदान दिल्याची घटना शहरातील जैन मंदिर परिसरात घडली. या सापाला त्याच्या सुरक्षित अधिवासात निसर्ग मुक्त करण्यात आले आहे. जवळपास एक तास अंथरुणाजवळ जवळ असलेल्या या नागाने कोणालाही इजा न केल्याने मोठा अनर्थ टळला.
Sarpamitra gave life to Cobra found in the house.
शहरातील जैन मंदिरात सुरू असलेल्या कामासाठी येथे छत्तीसगढी मजूर आलेले आहेत. या मजुरांनी परिसरातच राहण्यासाठी कच्ची घरे उभारली आहे. अशात एका कामगाराच्या घरात पहाटेच्या वेळेस एका पाच फूट लांबीच्या अत्यंत विषारी नागाने प्रवेश केला. अंथरुणाजवळच फणा काढून त्याने आपले बस्तान बसविले. जाग आल्यावर घरातील लोक हा भला मोठा फणा काढलेला नाग पाहून घाबरले. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी याची माहिती सर्पमित्रांना फोन द्वारे दिली. माहिती प्राप्त होतात सर्पमित्र अमृत बावणे, सौरभ घोटेकर व साहिल घोटेकर हे घटनास्थळी पोहोचले व मोठ्या शिथापीणे या नागाला पकडले. प्रथम या नागाची वनविभागात नोंद करण्यात आली व v या नागाला निसर्ग मुक्त करण्यात आले. मात्र जवळपास तासभर घरात ठाण म्हणून बसलेल्या या नागाने कोणाला इजा न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment