Ads

घुग्घूस पोलिस स्टेशन हद्दीत देशी कट्ट्यासह आरोपी स्थानिक गुन्हे शाखा चे जाळयात

चंद्रपुर :-दि. 23/08/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे गोपनिय माहिती मिळाली की, पो.स्टे. घुग्घूस हद्दीत एक इसम आपले राहते घरी अवैध्यरित्या देशी कट्टा बाळगुन आहे अशा खात्रीशीर खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांनी पो.उपनि. विनोद भुरले, पो. हवा संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार, पो.कॉ.गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे पथक नेमून कारवाई करीता आदेशीत केले.LCB arrested a Accused with Country made Gun in Ghugus Area
सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे पो.स्टे. घुग्घूस हद्दीतील नामे संतोष उर्फ कुट्टी राजकूमार रॉय वय 19 वर्षे रा. बॅक ऑफ इंडीया मागे वार्ड नं.03 घुग्घूस ता. जि. चंद्रपूर याचे घरी जावून त्याचे उपस्थीतीत घरझडती घेतली असता त्याचे घरात एक देशी कट्टा अ. कि. 5000/- रू. मिळून आला. सदर आरोपी विरुद्ध पो.स्टे. घुग्घूस येथे अप.क्र. 360/2023 कलम 3 25 भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पुढील तपास कामी पो.स्टे. घुग्घूस यांचे ताब्यात देण्यात आले...

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्था. गु.शा. चे पो.उपनि, विनोद भुरले, पो. हवा संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे मदतीने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. घुग्घूस करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment