Ads

सोमय्या सारख्या नेत्याची भाजप ने हकालपट्टी करावी - शहराध्यक्ष सुरजभाऊ शाहा

तालुका प्रतिनिधी भद्रावती :- भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता आम आदमी पार्टी भद्रावती शहर अध्यक्ष मा. सुरजभाऊ शाहा यांनी भाजपवर टीका केली आहे. किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे खरे चरित्र उघड होत असल्याची टीका आप भद्रावती शहर अध्यक्ष मा. सुरज शाहा यांनी केली आहे. BJP should expel leader like Somaiya-APP City President Surajbhau Shaha
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून सोमय्या यांनी अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. दुसऱ्यांवर चिखल उडवणारे सोमय्या स्वत: चिखलात लोलतायेत. भाजप चे बृजभुषण सिंह आणी आता हे सोमय्या असे अश्लील काम करत असेल तर भाजप ने त्यांना संरक्षण देन बंद करावे व यांच्यावर कठोर कारवाई करावी. महिलांसोबत सोमय्या असे अश्लील प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही याची गृहमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे व भाजपने सोमय्यां सारख्या नेत्यांची पक्षातुन हकालपट्टी केली पहिजेत अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष मा. सुरजभाऊ शाहा यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment