Ads

कायदेशीररीत्या अर्हताधारक डॉक्टर्सवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई नको : डॉ.सुतार

मुंबई प्रतिनिधी : Alternative Medicine, Naturopathy, Community Medical Service And Essential Drug, Electro Homeopathy अल्टरनेटिव मेडिसिन, नॅचरोपॅथी, कम्युनिटी मेडिकल सर्विस अॅन्ड इसेंशियल ड्रग, इलेक्ट्रो होमिओपॅथी पात्रता धारक डॉक्टर्सवर बोगस डॉक्टर म्हणून आरोग्य विभागाकडून कारवाई न करण्याची मागणी आयुष भारत अल्टरनेटिव्ह मेडिकलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुतार यांच्या वतीने करण्यात आली असून यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुतार यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
Legally qualified doctors should not be prosecuted as bogus doctors: Dr.Sutar
अल्टरनेटिव मेडिसिन, नॅचरोपॅथी, कम्युनिटी मेडिकल सर्विस अॅन्ड इसेंशियल ड्रग, इलेक्ट्रो होमिओपॅथी अहर्ता धारक डॉक्टर्सवर आरोग्य विभागाकडून बोगस म्हणून कारवाई करण्यात येत आहे ही बाब चुकीची असून महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भागात अतिआवश्यक असलेली रुग्णसेवा हे सहयोगी डॉक्टर्स देत आहेत. पण काही तथाकथित लोक या डॉक्टरांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करतात तर काही नेते मंडळी राजकीय द्वेषापोटी प्रशासनाला निवेदन देऊन व प्रशासनावर राजकीय दबाव आणून डॉक्टर्सवर कारवाई करण्यास भाग पडतात. परंतु हे डॉक्टर्स कायदेशीररित्या उच्च न्यायालय व शासनाच्या विविध आदेश व निर्णयाचे येथोचित पालन करून आपला व्यवसाय करू शकतात. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे वेळोवेळी विविध आदेश व परिपत्रक पारित केले आहेत. त्यानुसार हे सर्व अर्हताधारक डॉक्टर्स कायदेशीररित्या आपला वैद्यकीय सेवा देवु शकतात. तरी आरोग्य खात्याचे मंत्री या नात्याने कायदेशीररित्या अहर्ताधारक डॉक्टर्सवर अन्याय होणार नाही याबाबत सर्व संबंधीतांना सूचना व निर्देश द्यावेत अशी मागणीही दिलेल्या निवेदनाद्वारे आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉ.सुतार यांनी केली आहे. निवेदनाची प्रत आरोग्य सचिवांना सुद्धा देण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment