चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीला सत्तेतून हद्दपार करण्याची मोहीम विदर्भातून सुरू झाली. आता कर्नाटकामध्ये काँग्रेस सत्तेत आलं. भाजपच्या अस्ताची नांदी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे.Karnataka victory heralds BJP's downfall: MP Balu Dhanorkar
भाजपचे सरकार कर्नाटक मध्ये असताना येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. कर्नाटक राज्याच्या विकासासाठी भाजपने केलेला दुर्लक्षितपणा भोवला आहे. एवढेच नव्हे तर राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे. मोदींनी घेतलेल्या २०-२२ सभा व १०-१२ रोड शो देखील भाजपाला वाचवू शकले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भागात जोडो यात्रेला सर्वसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचेच प्रतिबिंब या निकालाच्या निमित्ताने दिसत आहे. प्रचंड महागाई, भष्ट्राचार, टोकाचे धार्मिक वाद, हिजाब प्रकरण सत्ताधारी भाजपा विरुद्ध प्रचंड असंतोष यामुळेच जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणूक देखील काँग्रेस जिंकेल असा विश्वास खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल : आमदार प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर : कर्नाटक राज्यातील जनता काँग्रेसच्या सत्तेची प्रतीक्षा करीत होते. आज तो दिवस उगवलेला आहे. तमाम कार्यकर्ते, प्रदेश नेते आणि राष्ट्रीय नेत्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. कर्नाटक राज्यामध्ये जे सत्तांतर झाले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र राज्यात देखील होईल अशी प्रतिक्रिया वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.
Karnataka Result will be repeated in Maharashtra: MLA Pratibha Dhanorkar
कर्नाटक राज्यातील जनतेने राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसला बहुमताने विजयी करून भविष्यातील होणाऱ्या अधोगतीपासून स्वतःला वाचवून घेतले आहे. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या भाजप सरकारला ही चपराग आहे. भविष्यात देशातील विविध राज्यांमध्ये देखील त्याचे पडसाद दिसून येतील, अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.
0 comments:
Post a Comment