Ads

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऊर्जानगरात पाणपोईचे उदघाटन

ऊर्जानगर(चंद्रपूर):-आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी महामानव विश्वरत्न माहाकारूनिक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमीत्त तसेच वाढते तापमान लक्षात घेता मार्केटपरिसरात येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूकरिता युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्यावर्षी ऊर्जानगर वसाहतीतील कामगार मनोरंजन केंद्र येथे पाणपोई सुरू करण्यात आली. Inauguration of Panpoi in Urjanagar on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शाम राठोड साहेब उपमुख्य अभियंता सी.एस.टी. पी.एस,चंद्रपूर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.उदघाटन प्रसंगी राठोड साहेब यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात व युवा सोशल फाउंडेशन द्वारा राबविण्यात येत असलेल्या कार्याला आणि जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात.यावेळी ऊर्जानगर वसाहतील अधिकारी,कर्मचारी व युवा सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य व ऊर्जानगर वासीयांची उपस्थिती होती असे देवराव कोंडेकर यांनी कळविले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment