Ads

जंगलात हरवलेल्या वेडसर व्यक्तीला वनविभागाने दिले जीवदान

मोहूर्ली:Mohurli Forest Zoneमोहूर्ली वनपरिक्षेत्र मध्ये दिनाक 31/12/2022 रोजी अचानक घरातून निघून जाऊन वनांमध्ये शिरलेल्या श्री.राजेश चरण दास मेश्राम रा.मोहूर्ली वय 48 वर्ष या मानसिक अवस्था ठीक नसलेली व्यक्ती दिनांक 31 डिसेंबर रोजी पर्यटक यांना जंगलात दिसले असता सदर माहीती मोहूर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना दिली.The forest department gave life to a crazy person who was lost in the forest
असता तयांनी लगेच पथक नेमून इसम याचा शोध घेणे सुरू केले असता सदर इसम सायंकाळी 6 वाजता च्या दरम्यान दिसून आला त्याच्या जवळ गेले असता सादर इसम जंगलात पळून जात होता,2 दिवसापासून सतत सदर इसम दिसत होता परंतु वनकर्म चारी दिसले की पळून जात होता, शेवटी चारही बाजूने घेराव करून सदर व्यक्तीला पकडून कुटुंब कडे सोपविण्यात आले,सदर व्यक्ती व्यवस्थित असून प्रकृती चांगली आहे..
हरवलेला व्यक्ती सापडली असल्याने 3 दिवसापासून सुरू असलेल्या मोहिमेला यश प्राप्त झाले असून 3 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजता स्थानिक यांचेकडून वनविभागाचे आभार मानले जात आहे...
शोध मोहीम श्री.संतोष थिपे यांचे नेतृत्वाखाली वनपालसंजय जुमडे,वनरक्षक सुरेंद्र मंगाम,वनरक्षकआकाश राठोड,वनरक्षक विखुल जनबंधु आणि वनमजूर यांना मदत म्हणून पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर, राजू दशरथ ढवळे यांचे सहकार्य लाभून पथकाने पार पाडले... दिवसरात्र मोहीम राबवून हरवलेल्या व्यक्तीला शोधून काढल्याने वनविभागास मोठे यश मिळाले कारण सदर परिसरात मोठया प्रमाणात वाघ बिबट अस्वल या हिंस्त्र प्राण्यांचे अस्तित्व असून' देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय आला आणि देवाची भूमिका वनविभागाने पार पाडल्याने वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे....दिवसरात्र मोहीम राबवून हरवलेल्या व्यक्तीला शोधून काढल्याने वनविभागास मोठे यश मिळाले कारण सदर परिसरात मोठया प्रमाणात वाघ बिबट अस्वल या हिंस्त्र प्राण्यांचे अस्तित्व असून' देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय आला आणि देवाची भूमिका वनविभागाने पार पाडल्याने वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे....
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment