नागपूर :म्हाडा कडून सुरु करण्यात आलेल्या एसटीपी प्लॅंटमध्ये गैरप्रकार झाला असल्याचा विषय आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची स्वतः पाहणी करुन गैरप्रकार आढळल्यास कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आश्वासन दिले आहे.
Physically inspect the sewerage channel and STP plant project and if necessary also backlist the contractor
नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु आहे. यावेळी तारांकीत प्रश्नावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडा अंतर्गत सुरु असलेल्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी प्लॅंटच्या गैरप्रकाराबाबत सभागृहाला अवगत केले.नविन चंद्रपूर म्हाडा परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी एसटीपी २४ एमएलडी व८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत सुरु असलेल्या कामात निकृष्ट दर्जाची सामग्री वापरण्यात येत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक संघटनांच्या वतीने केल्या जात आहे. सदर प्रकरणाची चैकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समीती गठीत केली आहे. दरम्याण पहिल्यास पावसात कटार योजनेची सुरक्षा भिंत कोसळल्याचा प्रकार येथे घडला आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा लक्षात आला आहे.
सदर कामाची चौकशी बाबत संजीवनी पर्यावरण संस्थेच्या वतीनेही उपोषण करण्यात आले आहे. तर दाताडाचे माजी सरपंच रविंद्र लोणगाडके यांनीही याबाबत तक्रारी केल्या आहे. याकडे आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सदर काम अतिषय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी यावेळी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देतांना आपण स्वतः या कामाची पाहणी करु व आवश्यकता असल्यास सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकु असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनीही सदर कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
0 comments:
Post a Comment