राजुरा:- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित 23 वर्षातील राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक 7 व 8 डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मध्ये आयोजित केलेली आहे, याकरिता चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघटनेद्वारे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते सदर जिल्हा निवड चाचणीत जिल्ह्याभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी पाच खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे.
District Team Announced for State Field Sports Tournament
चंद्रकांत शेलोटे 400 मीटर धावणे, उज्वल चांदेकर 5000 मीटर धावणे, विवेक ढुमणे 20 किलोमीटर चालणे, दुर्योधन शेंडे 400 मीटर अडथळा व अमन करमणकर तिहेरी उडी अशी खेळाडूंची नावे आहेत.
निवड झालेले स्पर्धक चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून खेळाडूंच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, सचिव श्री सुरेश अडपेवार, श्री मकरंद खाडे, निवड समिती प्रमुख कु. पूर्वा खेरकर, प्रा. संगीता बांबोडे, कु. वर्षा कोयचाडे, श्री निलेश बोढे, श्री रोशन भुजाडे, श्री स्वप्निल सायंकर व इतर सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
0 comments:
Post a Comment