भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
दि. ०५/१२/२२ रोजी फिर्यादी आशीष दिलीप धारणे धंदा नौकरी इंजीनीअर रा. सुगत नगर बुद्ध विहारजवळ नारी रोड नागपुर ह.मु. प्रवीण काळे यांचे घरी कुचना ता. भद्रावती जि. चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे रिपोर्ट दिला की, वणी ते वरोरा हायवे रोडवरील शेंबळ टोल बुथ येथे सिसिटीव्ही व इतर इलेक्ट्रानीक्स साहीत्य ची फिटींग चालु असल्याने सदर फिटींग करीता वान इंद्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनी फरीदाबाद कडुन सिसीटीव्ही कॅमेरे, सिपीयु, मॉनीटर, बॅटरी इत्यादी साहीत्य पुरवीण्यात आले होते ते साहीत्य टोल बुथ वरील मेडीकल रूममध्ये ठेवुन लागले सामान वापरत होते व बाकी सामान रूममध्येच ठेवुन राहत होते. ते सामान दि.०५/१२/२२ रोजी रात्रो दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरानी मेडीकल रूमचा काच फोडुन आत प्रवेश करून त्यातील १) लिव्हगार्ड सोलर कंपनीची मोठी बॅटरी कि. अं. १५,०००रू., २) एक्साईड पॉवरसेफ प्लस कंपनीच्या ०८ नग बॅट-या कि. अं. ५०,००० रू., ३) लेनोव्हा कंपनीचे ०४ नग सिपीयु कि. अं. १,३२,०००रू., ४) लेनोव्हा कंपनीचे मॉनीटर ०४ नग कि. अं. ४५,२००रु. ५) युएनव्हि H कंपनीचे विआयडीएस सिसिटीव्ही कॅमेरे ०२ नग कि. अं. ८०,०००रू., ६) एचपी कंपनीचे लेझर जेट प्रो प्रिंटर कि. अं. १६,४८० रु., ७) मॅकोटेक कंपनीचे युपीएस १ नग कि. अं. ५०००रु. ८) सिपी प्लस कंपनीचे लेन प्लेट सिसिटीव्ही कॅमेरा १ नग कि. अं. १४,१००रू., ९) बुथ डोम सिसिटीव्ही कॅमेरा १ नग कि. अं. ९,४०० रु., १०) डि लींक कंपनीचे नेटवर्क स्विच २४ पोर्ट कि. अं. ३१,८०० रु. असा एकुन ३,९८, ९८० रु. चा माल चोरून नेला अशी तक्रार दाखल केल्याने पो. स्टे. वरोरा येथे अप.क्र. ७५८/२२ कलम ४५७, ३८० भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेटी दरम्यान आरोपीने सदर मेडीकल रूमचे खिडकीचा काच फोडल्याने घटनास्थळावर मिळालेल्या चपलेवर तसेच काचाच्या तुकडयावर व इलेक्टानीक्स साहीत्याचे बॉक्सवर रक्ताचे डाग दिसुन आल्याने आरोपीने गुन्हा करतांना त्यास दुखापत झाल्याचा वाजवी संशय आल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येताच त्या दृष्टीकोनातुन पो.स्टे. वरोरा व माजरी रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना चेक केले व गुप्त बातमीदार मार्फत माहीती घेतली असता सदर गुन्हा आरोपी नामे १) चेतन संतोष कळसकार वय २० वर्ष रा. शेंबळ व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी केल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे शरीराची तपासणी केली असता आरोपीच्या उजव्या हाताला काचाने कापलेल्या जखमा आढळुन आल्या व विधी संघर्षग्रस्त बालकाच्या उजव्या पायाची करंगळी खालुन कापलेली दिसुन आली असल्याने त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने व गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी २,४३,७८० रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख सा. यांचे मार्गदर्शनात पो.नि. दिपक खोब्रागडे, सपोनि निलेश चवरे, पोउपनि किशोर मित्तरवार, गुन्हे शोध पथकातील दिपक दुधे, किशोर बोढे, सुरज मेश्राम, दिनेश मेश्राम यांनी पार पाडली. पुढील तपास पोउपनि किशोर मित्तरवार करीत आहे.
0 comments:
Post a Comment