चंद्रपुर :-मतदार संघात अभ्यासिका आणि समाज भवन निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. अनेक ठिकाणी याचे काम पूर्ण झाले आहे. तर काही कामे प्रस्तावित आहे. याचा मोठा फायदा भविष्यात दिसुन येणार आहे. येथे साकार होत असलेल्या समाज भवनाच्या माध्यमातून समाज बांधवांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Through the Samaj Bhavan, the platform of rights will be available to the members of the society. Kishore Jorgewar
स्थानिक आमदार निधी अंतर्गत इंदिरा नगर आणि बंगाली कॅम्प येथे समाज भवन मंजुर करण्यात आले आहे. या समाज भवनाच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. या भुमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शाहा, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सिद्धार्थ मेश्राम, नितेश गवळे, हरमन जोसेफ, विलास वनकर, पियुश मंडल, डॉ. अमोल पोद्दार, सत्याजित पोद्दार, दिलीप मंडल, गुरुपाद मनदाल, शिखा सरदार, अजय किर्तनिया, आशिम गोसाई, गणेश मंडल, रुपेश मुलकावार, नरेश आश्राम, रंजीत मडावी, सुरज शाहा, गणेश किव्हेकर, प्रविण पंचबुध्दे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असुन येथील प्रलंबीत विकास कामांसाठी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास साधल्या जात आहे. दरम्याण स्थानिक नागरिकांच्या मागणी नंतर चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर येथील राधाकृष्ण मंदिराच्या खुल्या शासकिय जागेवर समाज भवनाच्या बांधकामासाठी स्थानिक आमदार निधीतुन 11 लक्ष रुपये तर बंगाली कॅम्प जवळील श्री हरी मंदीर येथील समाज भवनाच्या बांधकामासाठी 22 लक्ष रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजुर केला आहे. या कामाचे त्यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, विद्यार्थी घडला की तो समाज घडवितो. त्यामुळे चंद्रपूर मतदार संघाचा विकास करत असतांना शिक्षण आणि समाज सक्षमीकरण या दोन विषयांवर माझा अधिक भर आहे. आपण मतदार संघात 11 सुसज्ज अभ्यासिका तयार करत आहोत. तसेच गाव तिथ समाज भवण ही संकल्पनाही राबविण्याचा माझा मानस आहे. आज अनेक छोटे समाज विकासापासुन दुरावत जात आहे. त्यांच्यातील एकतेत खंड पडला आहे. त्यामुळे या समाजाला एकत्रीत येणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. समाजाला एकत्रीत येता यावे त्यांचे धार्मीक, सामाजिक, शैक्षणीक, पारंपारीक कार्यक्रम साजरे करता यावे या करिता आपण समाज भवन निर्मीतीकडे आपले विशेष लक्ष देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. सोबतच शहरातील मुलभुत सोयी सुविधांसाठीही आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला असुन नागरिकांनीही त्यांच्या भागात प्रलंबीत असलेली कामे माझ्या पर्यंत पोहचवावी असे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. दोन ठिकाणी पार पडलेल्या या भूमिपूजन कार्यक्रमाला इंदिरा नगर येथील राधाकृष्ण सेवा समितीचे संदिप पाटणकर, सुनिल जिवतोडे, प्रविण धारणे, प्रशांत भद्रा, महेश भाजरा, सदमा कुरेकार धनराज ताडाम आदींची यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment