भद्रावती(तालुका प्रतिनिधी): गावात अवैधपणे दारूविक्री करीत असलेल्या दारूविक्रेत्याला दारू विकणे बंद कर, असे म्हणून हटकले असता तो एकदम शिवीगाळ करीत सरपंचावर धावून जाऊन मारहाण करून जखमी केले. सरपंचाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
चंदनखेडा येथील गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीला कंटाळून दारू विक्रेत्याच्या घरावर धडक दिली. झाली. सरपंच नयन जांभुळे व तंटामुक्ती अध्यक्ष मनोज हनवते यांना
घटनास्थळी बोलावून दारूविक्री बंद करण्यास म्हटले असता सरपंचांनी दारू विक्रेता सुधीर बंडू दोहोतरे याला गावात अवैधपणे दारू विकत असून ती बंद करे, असे म्हणून सरपंच व तंटामुक्ती अध्यक्षांनी हटकले. दरम्यान दारूविक्रेता सुधीर दोहतरे शिवीगाळ करीत सरपंचाच्या अंगावर धावून गेला व बुक्क्यांनी सरपंचाला मारहाण करणे सुरू केले. त्यामुळे सरपंचाच्या छाती, डोक्याला मार लागून दुखापत घटनेनंतर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
0 comments:
Post a Comment