चंद्रपूर : आई वडीलानंतर दुसरा गुरू हा शिक्षक असतो. परंतु राज्यामध्ये शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात अनेक शाळेत शिक्षक कमी असून त्यातच विषय शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
राज्यात शिक्षक भरती करत असताना अनेक कारणाने ती पुढे ढकलण्यात आली. या काळात मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे अनेक शाळेतील शिक्षकांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे इंग्रजी, विज्ञान व गणित हे विषय शिकवणारे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यांचे भविष्य अंधारात जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असून एकही शिक्षक अतिरिक्त नसल्याची बाब देखील पत्राच्या माध्यमातून आवर्जून सांगण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध शिथिल केले आहे. तरी देखील अद्याप शिक्षण विभागाने शिक्षक भरतीचा अद्यादेश काढलेला नाही. यावर देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षणाच्या अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे. परंतु शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. अनेक विभागात आता भरती प्रक्रिया राबविण्याचा मानस सरकार दाखवीत आहे. त्यात शिक्षक भरती तात्काळ घेऊन उद्याचे भविष्य असलेले विद्यार्थी डोळ्यासमोर ठेऊन या भरती प्रक्रियेचा अध्यादेश तात्काळ काढण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
0 comments:
Post a Comment