ब्रम्हपुरी :- कोंबड्यावर ताव मारण्यासाठी बिबट पहाटेच्या सुमारास एका घरात घुसला. घर मालक जागा झाल्याने बिबट कोंबडा घेऊन पळता भूई होत असताना गावातील एका विहीरीत पडला. वनविभागाच्या रेस्क्यू टिमने त्या बिबट्याला सकाळी कोंबड्याच्याच मदतीनेचे विहीरीबाहेर काढून जिवदान दिले आहे.Rescue team Rescued leopard ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपूरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चहूबाजूंनी जंगलाने वेढलेल्य किटाळी बोदरा या गावात घडली.
A leopard fell into a well in search of prey
प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपूरी तालुक्यात अगदी शेवटच्या टोकावर किटाळी (बोदरा) हे गाव वसले आहे. चहूबाजूनी घनदाट जंगल आहे. त्यामुळे या गावातील पाळीव जनावरे बिबट्याचे शिकार करतात. अशीच एक घटना कोंबड्यावर चटावलेल्या बिबट्याच्या बाबत घडली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास किटाळी बोदरा गावात कोंबड्याची शिकार करण्याकरीता एका घरात बिबट घुसला. पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने कोंबड्याची शिकार करण्याकरीता त्यांचेवर झडप टाकली. कोंबड्याचा आरडाओरडण्याच्या आवाजाने घर मालक जागा झाला. त्यांने बॅटरीने आपल्या घराच्या सभोवती पाहिले असता, बिबट आढळून आला. त्याचेवर बॅटरीचा प्रकाश पडताच तो कोंबडा घेऊन पळत सुटला असता संतोष मसराम यांच्या घराशेजारील सार्वजनिक विहीरीत धाडकन पडला. लगेच त्या घरमालकाच्या ओरडण्याच्या आवाजाने घराशेजारील नागरिक जागे झाले. विहीरीत गुरगुरण्याचा आवाजाने विहीर परिसरात नागरिकांनीच पहाटेपासून गर्दी व्हायला लागली. लगेच ब्रम्हपुरी वनविभागाला माहिती देण्यात आली. सकाळीच वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे, महेश गायकवाड, क्षेत्र सहायक सय्यद, नागोसे, वनरक्षक प्रधान, मडावी व अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी विहीरीत बघितले असता बिबट पडलेला आढळून आला. जिव वाचविण्याकरीता तो कासाविस करीत होता. त्यामुळे तात्काळ सिंदेवाही येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. तसेच गावातील पिआटी चमू व नागरिकांच्या सहकार्याने रेस्क्यू करण्यात आले.
0 comments:
Post a Comment