चंद्रपूर: जिल्हातील निसर्गरम्य ठिकाण असलेले प्राचिन गोंडकालिन जुनोना तलाव, शहरापासुन जवळच असलेल्या जूनोना तलावाची दुरावस्था झालेली आहे. त्यास कारणीभुत तलावात वाढलेली जलपर्णी वनस्पती यामुळे तलावाचे सौदर्यासोबतच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज जागतिक मत्सव्यवसाय दिन निमीत्त जुनोना तलाव संवर्धनासाठी इको-प्रो तर्फे मागणी करीत राज्याचे वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बंडू धोतरे यांनी निवेदन दिले. यावेळी इको-प्रो चे नितिन रामटेके व अन्य सदस्य उपस्थित होते.
तलावात वाढलेली जलपर्णी वनस्पतीमुळे जलचर संकटात असुन मासेमारी करणे अशक्य होत असल्याने स्थानिक रोजगाराची समस्या निर्माण झालेली आहे.
यंदा स्थलांतरित पक्षी गर्दी कमी
सदर जुनोना तलाव जंगलव्याप्त असल्याने स्थलातरिंत पक्ष्याची मोठी गर्दी होत असे मात्र तलावात वाढलेली जलपर्णी यामुळे तलावातील जैवविवीधता, पक्षी अधिवास संकटात आल्याने स्थलातरींत पक्ष्यानीही पाठ फिरवीली आहे.
जूनोना तलाव होता सारस पक्षी अधिवास
सदर तलाव जिल्हयात एकमात्र असलेला सारस पक्ष्याचे शेवटचे अधिवास होते, मा. उच्च न्यायालयाच्या 'सारस पक्षी संवर्धन ' 'Stork Conservation' जनहित याचिकेच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शेवटचे 'सारस' 'Stork' पक्षी अधिवास असलेले एकमेव तलाव जूनोना तलाव आहे. या तलाव व अधिवास संवर्धनाचे कार्य करावयाचे असुन तसे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समीतीने आराखडा तयार केलेला आहे. त्याच्या खर्चास मंजुरी प्रदान करणे गरजेचे आहे.
ऐतिहासिक गोंड़कालीन आहे जूनोना तलाव
गोंड़राणी हितारानीGondrani Hitarani आणि गोंड़राजे खांडक्या बल्लाळशहाGondaraje Khandkya Ballalshah जूनोना तलाव बांधून त्याठिकानी 'जलमहल' 'Jalmahal'बांधकाम केले. त्यामुळे या तलाव परिसराला ऐतिहासिक महत्व आहे. दरवर्षी या परिसरात युवक- विदयार्थी यांना एकत्रित करून स्वच्छता करिता ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या अभियान राबविले जातात.
पर्यटनीय महत्वाचे जूनोना तलाव
शहरापासुन अगदी जवळ असल्याने सुटटीच्या दिवशी स्थानिक पर्यटकांना, चंद्रपूरकरांना फिरायला जाण्यास योग्य ठिकाण आहे, तलावाचे नैसर्गीक सौदर्य बाधीत झालेले असल्याने अनेकांचा हिरमोड होतो आहे. अत्यंत महत्वपुर्ण असलेला जुनोना तलाव Lake Junona संवर्धनासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी इको-प्रोने केली आहे.
0 comments:
Post a Comment