Ads

इको-प्रो तर्फे पक्षीनिरीक्षण तथा जनजागृती कार्यक्रम

भद्रावती - पद्मभूषण डॉ सलीम अली तसेच सेवानिवृत्त वनाधिकारी श्री मारुती चितमपल्ली यांनी पक्षी संवर्धनाकरिता केलेल्या अमूल्य कार्याची दखल म्हणून यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याच निम्मिताने इको -प्रो भद्रावती तर्फे पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.Bird watching and awareness program by Eco-Pro

या दरम्यान शहरालगत व तालुक्यात असलेल्या काही पानवठ्यांवार पक्षी निरीक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे,
दि.५ नोव्हे. लाघोडपेठ तलाव,दि.६ नोव्हे. ला दुधाळा व लेंडारा तलाव ,दि.७ नोव्हे. ला चिंतामणी तलाव,दि.८ नोव्हे. ला मल्हारा तलाव,दि.९ नोव्हे ला विंजासन तलाव,दि.१० नोव्हे. ला घोट-निंबाळा तलाव, दि.११ नोव्हे. ला डोलारा तलाव तसेच दि.१२ नोव्हे ला गौराळा तलाव या तलावांवर दररोज सकाळी ६ ते ८.३० या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात पक्षीनिरिक्षणा सोबतच पक्षांचे निसर्गात असणारे महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास संवर्धन , स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण या सोबतच पक्षीसंरक्षण व संवर्धन कायद्या विषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
हिवाळ्याची चाहूल लागताच प्रवासी पक्षी विविध भागातून येत असतात. वर्षभर नजरेआड असणाऱ्या या रंगबेरंगी पक्ष्यांना पाहण्याची, त्यांना अभ्यासनाची व त्यांचे संवर्धन करण्याची ही सुवर्ण संधी आहे. स्थानिक पक्षानं सोबतच या प्रवासी पक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी ही स्थानिक नागरिकांची आहे त्या करिता संपूर्ण आठवलाभर चालणाऱ्या या उपक्रमात विधार्त्यांनी, सामाजिक संघटनांनी, पक्षी अभ्यासकांनी तसेंच सामान्य नागरिकांनी मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन इको -प्रो तर्फे करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment