Ads

चंद्रपूरातील बस स्‍थानकांच्‍या वाहनतळाच्‍या सिमेंटीकरणासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. निधी मंजूर .

चंद्रपुर :-चंद्रपूर शहरातील मुख्‍य बस स्‍थानकाच्‍या वाहनतळास सिमेंटकॉंक्रीटीकरणासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. इतका निधी मंजूर झाला असून राज्‍याचे वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.4 crore 52 lakhs for cementing the parking lot of bus stations in Chandrapur.
Funding approved
राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या स्‍थापत्‍य अभियांत्रीकी विभागाचे उपमहाव्‍यवस्‍थापक यांनी दिनांक ३१ ऑक्‍टोंबर २०२२ च्‍या पत्रान्‍वये सदर रकमेच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता दिली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्‍य बस स्‍थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर शहरातील बसस्‍थानकाच्‍या आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे कामासाठी १६ कोटी रू. निधी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर करण्‍यात आला. या बस स्‍थानकाच्‍या वाहनतळाचे सिमेंटीकरणासाठी निधी मंजूरीच्‍या प्रस्‍तावाचा त्‍यांनी प्रयत्‍नपूर्वक पाठपुरावा करून यासाठी ४ कोटी ५२ लक्ष रू. निधी मंजूर केला आहे.

सदर बस स्‍थानक लवकरच प्रवाश्‍यांच्‍या सेवेत रूजु होईल असा विश्‍वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment