Ads

वेकोलिने क्वाॅर्टर खाली करण्याची दिली नोटीस

घुग्घुस :- घुग्घुस येथील वेकोलि वसाहतीच्या गांधी नगर, सुभाष नगर येथे राहणाऱ्या २०० कुटुंबियांना क्वाॅर्टर खाली करण्याची नोटीस वेकोलिने दिली.WCL gives notice to drop quarter
त्याअनुषंगाने वेकोलि वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली व समस्या सांगितली. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले.
याप्रसंगी महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त केले.
वेकोलि वसाहतीत अनधिकृत रित्या राहणाऱ्या नागरिकांना क्वाॅर्टर खाली करण्याची नोटीस वेकोलिने दिली. त्यामुळे तत्काळ क्वाॅर्टर खाली करावे लागत असल्याने त्यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला. लहान मुलांच्या परीक्षा सुरु आहे त्यामुळे कुठे जाऊन राहायचे अश्या विवंचनेत असलेल्या महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली व आपली समस्या सांगितली.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, राजेश मोरपाका, अमीना बेगम, नजमा कुरेशी, निशा रामटेके, प्रज्ञा साव, शिल्पा गोरे, सलोमी मामीडपेल्ली, सुरेखा तोडासे, बेबी श्रीपेल्लीवार, लिंगय्या तालापेल्ली, रामेश्वरी गोदारी, आचल कांबळे, मीरा कातरकर, मंगला पत्रकार, कल्पना पाझारे, लता तक्कला, शाम रासनाला, सनी मंडल, रेश्मा अट्टेला, मंदा मडावी, श्रीनिवास गादम, शबाना शेख, मुस्तफा शेख, किशोर इंगोले, नंदा अट्टेला, सोनाली अट्टेला, सरोजा डोरके, उर्मिला गोगला, लक्ष्मी बारसागडे, राकेश दिंडीगाला सुमित मंडल, अक्षय लठ्ठा, गजानन उलमाले, विशाल दामेर, धर्मराज कावेरी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment