Ads

भारताला विश्‍वगुरूपदी पूनर्स्थापित करणे हाच संघ उद्देश

चंद्रपूर :कधीकाळी भारत विश्‍वगुरूपदी विराजमान होता. ते स्थान पूनर्स्थापित करण्याचे कार्य संघ करीत आहे. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य, प्रकृती आणि उदात्त विचार विश्‍वात रूजवणे, भारताला विश्‍व स्थापित करणे हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम क्षेत्र सहसंपर्क प्रमुख विजय देवांगण यांनी येथे केले.Union objective to restore India as a world champion
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव शनिवार, 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला. यावेळी देवांगण मार्गदर्शन करीत होते. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. सुशील कपूर, रा. स्व. संघाचे नगर संघचालक तथा ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. रवींद्र भागवत, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार व्यासपीठावर उपस्थित होते.
देवांगण म्हणाले, गत 97 वर्षांपासून संघाचे कार्य अविरत सुरू आहे. सज्जन शक्ती, सात्विक शक्ती समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये विराजमान आहे. तीच शक्ती जागृत करण्याचे कार्य संघ करीत आहे. रा. स्व. संघ जाती, धर्म, पंथाचे किंवा व्यक्तीगत कार्य करणारे संघटन नाही, तर राष्ट्र निर्माण करणारी शक्ती आहे, असेही ते म्हणाले.
15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. परंतु, पुढची 50 वर्ष हा देश स्वाभीमानशुन्यतेत राहिला. अस्पृश्यता, जातीवाद, प्रांतवाद आदी विसंगती कायम होती. ही दुर्जन शक्ती भारताला विभाजित करू नये यासाठी संघ तेव्हाही कार्यरत होते. मात्र 11 ते 13 मे 1998 दरम्यान भारताने 5 अणू विस्फोट घडवून आणले आणि त्या क्षणापासून स्वाभिमानी भारताचे दर्शन घडू लागले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, रक्षामंत्री जॉर्ज फर्नांडीस, इस्त्रोचे प्रमुख अब्दुल कलाम या हिंदू, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम समुदायातील धुरिनांनी स्वाभिमानी भारत जागवला. सार्‍या भेदाच्या साखळ्या गळून पडल्या. जेव्हा देशभक्ती जागृत होते, तेव्हा अमेरिकेचे अद्ययावत उपग्रहालाही थांगपत्ता लागत नाही. जगातील कुठलीही शक्ती देशगौरव प्राप्त करण्यात अडथळा आणू शकत नाही, असेही मत देवांगण यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व आभार अ‍ॅड. रवींद्र भागवत यांनी केले. दैनिक शाखेतून तयार झालेल्या स्वयंसेवकांमुळे संघाचे कार्य निरंतर वाढत आहे. गत 97 वर्षात संघाने उपेक्षा, विरोध, संघर्ष आणि आता अपेक्षा अशा विविध भूमिका बघितल्या आहेत. सद्याची संघाची विश्‍वव्यापी स्थिती त्यामुळेच वैशिष्ट्यपूर्ण ठरते, असे मत अ‍ॅड. रवींद्र भागवत यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी, ध्वजारोहणानंतर स्वयंसेवकांनी योगासन, नियुध्द, समता प्रात्यक्षिक सादर केले. सुभाषित व वैयक्तिक गीतही झाले. कार्यक्रमाला गणमान्य व्यक्ती आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.


संघाचे कुटूंब प्रबोधन उल्लेखनीज़ : कपूर
राष्ट्रसेवा व अनुशासन या मुलमंत्र घेऊन संघ कार्यरत आहे. संघाचे विविध आयाम आहेत. संघाकडून होत असलेले कुटूंब प्रबोधन त्यातल्या त्यात अत्यंत उल्लेखनीय कार्य आहे, असे मी माणतो. संघ आज समाजमान्य झाला आहे, हीच संघाची पावती आहे. शिक्षण क्षेत्रातही संघ विचार रूजला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. सुशील कपूर यांनी यावेळी व्यक्त केली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment