Ads

गोल्ला-गोलकर ( यादव ) समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी संपूर्ण शक्तीनिशीसमाजाच्या पाठीशी आहे- ना. सुधीर मुनगंटीवार .

चंद्रपुर:-मेळाव्याच्या निमित्ताने समाज बांधवात आपुलकी निर्माण होते. दुसऱ्यांचा द्वेष करून समाज कधीच मोठा होत नाही. ही भावना आपल्या मनात नेहमी राहिली पाहिजे. मी माझ्याच कार्यक्रमात आलो आहे असा भास होतो आहे. विद्यार्थ्यांनी खूप खूप शिकावं, मोठे व्हाव, खूप नाव कमवावा. जिल्ह्याचा गौरव वाढवावा तसंच देशाचाही गौरव वाढवावा. त्यांनी किती उंच इमारत उभी केली यावरून त्या समाजाचा गौरव निर्माण होत नाही तर त्यांनी आपले कर्तृत्व किती उंच निर्माण केलं यावरून त्या समाजाचा गौरव निर्माण होतो. समाजाच्या प्रगती करिता निश्चितपणे काही गोष्टी करण्याची गरज आहे. गोल्ला गोल गोलकर (यादव) समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी संपूर्ण शक्तीनिशी समाजाच्या पाठीशी आहे. असे मत महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
ते दिनांक 30 नोव्हेंबर चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय उपवर उपवधू परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त धारकांचा सत्कार सोहळ्यात उदघाटक म्हणून बोलत होते.

राजीव गांधी सभागृह चंद्रपूर येथे हा राज्यस्तरीय मेळावा पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतराव बर्रीवार तसेच प्रमुख अतिथी म्हणून रविकिरण यादव चित्रपट निर्माते तथा अध्यक्ष साई वैकुंठ ट्रस्ट आदीलाबाद, नामदेवराव आयलवाड अध्यक्ष गोल्ला गोलकर समाज महाराष्ट्र राज्य, डॉक्टर क्रीष्णपाल यादव खासदार गुना मध्य प्रदेश, देवराव भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष,डा मंगेश गुलवाडे , क्रीष्णाजी यादव ज्येष्ठ समाज सेवक नागपुर ,रघुवीर यादव सेवावृत्त तहसीलदार आदिलाबाद , श्रीरामजी गालेवाड पुणे, मनोहर बोदलवार गडचिरोली, पुरुषोत्तम कोमलवार सेवानिवृत्त नायब तहसीलदार मुलं , प्राचार्य डॉक्टर भास्कर बहिरवार, प्राचार्य साईनाथ अद्दलवर, आशिष कावटवार नगरसेवक, सोमेश्वरजी पाकवार सेवानिवृत मुख्याध्यापक, भास्कर नन्नावार बांधकाम सभापती, संतोष मंथनवार, यशवंत दंडिकवार, किरण ताई मॅकलवार माजी. जि.प सदस्या यवतमाळ,सुनिता मॅकलवर माजी नगरसेविका पोभुंर्णा , नयना मुद्देलवार माजी प.स.सदस्या घाटंजी , अजय मॅकलवार जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री कृष्ण आणि आराध्य दैवत माता महांकाली यांच्या प्रतिमेला मालार्पन आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे *डॉक्टर*खा, *क्रीष्णपाल* *यादव* *यांनी* .. अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण देशात व्हायला पाहिजे यामुळे समाजात जागरूकता निर्माण होते. आपण सर्व भगवान श्रीकृष्णाचे वंशज आहोत. समाज सर्वांना एकत्रित ठेवण्याचे व जोडण्याचे कार्य करते. आजही ते कार्य अविरतपणे सुरू आहे, अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करावे असे मत व्यक्त केले.
नामदेवराव आयलवाड यांनी ......बदलत्या काळात मानवी गरजा वाढल्या आहेत. गरजा पूर्ण करण्याच्या धावपळीत मानवी जीवन व्यस्त झाले आहे. अशा धावपळीच्या जीवनात कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याचे एक मोठे आव्हान आहे, परिचय मेळाव्यातून समाजबांधवात परस्परांमध्ये आपुलकी व जिव्हाळा निर्माण होतो, मेळाव्यामुळे समाज बांधवांच्या वेळेची व पैशाची बचत होते. त्यामुळे उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन ही काळाची गरज आह, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सेवा निवृत्त झालेले समाज बांधव, दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त - पुरस्कार प्राप्त समाज बांधव तसेच निवडणुकीत विजयी झालेले समाज बांधव यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी रघुवीर यादव,डॉक्टर रविकिरण यादव, श्रीरामजी गालेवाड, डॉक्टर प्राचार्य भास्कर बहिरवार, प्राचार्य साईनाथ अदलवार यांनी उपस्थितांना थोडक्यात मार्गदर्शन केले .शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपत बूर्रीवार यांनी.... आजच्या युगात समाजाने शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात प्रगतीचा पल्ला गाठण्याची गरज आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक क्षेत्रात पुढे यावे आणि प्रगती करावी, आजचे युग स्पर्धेचे, विज्ञानाचे आहे, त्यामुळे गरजेनुसार परिवर्तन झाले पाहिजे. परिवर्तन ही काळाची गरज आहे. उपवर- उपवधू परिचय मेळावा हे आज बदलत्या काळात महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक- जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवर, संचालन दिलीप मॅकलवर उपाध्यक्ष, मनोहर कोप्पूलवार, सरोज चांदेकर तर आभार प्रदर्शन शंकर मद्देलवार सहसचिव यांनी केले.
या राज्यस्तरीय महामेळाव्याला महाराष्ट्रातील गोल्ला गोलकर गोल्लेवार यादव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपवधू -उपवर परिचय मेळाव्यात अनेक उपवर -उपवधू यांनी आपला आपला परिचय करून दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी समाजाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवर, उपाध्यक्ष दिलीप मॕकलवार - किरण चेनमेनवार, सचिव महेश मॅकलवर, कोषाध्यक्ष कृष्णाजी दाऊवार, सहसचिव शंकर मद्देलवार- श्यामराज भंडारी, संघटक प्रवीण भिमनवार तसेच संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. राजीव गांधी सभागृहात आयोजित महामेळाव्याला राज्यातील गोल्ला गोलकर ,गोलेवार - यादव ,समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment