Ads

चंद्रपूर ते सावली पदत्रायेला प्रारंभ तीन दिवसांत ७५ किलोमीटरचे अंतर करणार पार

चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेसच्या प्रोफेशनल विंगच्या वतीने आयोजित चंद्रपूर ते सावली या तीनदिवसीय पदयात्रेला शुक्रवारी (ता. ३०) प्रारंभ झाला. गांधीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून यात्रेला सुरूवात झाली. खासदार बाळू धानोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवित यात्रेला सावलीच्या दिशेने रवाना केले.
Starting from Chandrapur to Sawli Padtraya
will cover a distance of 75 kilometers in three days
ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष तिवारी यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. तब्बल तीन दिवस ७५ किलोमीटरचे अंतर पार करून २ ऑक्टोबरला सावली चरखा संघात या पदयात्रेचा समारोप होणार आहे. सध्या राहुल गांधी हे कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंत पदयात्रा काढत आहेत. या पदयात्रेला स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ही यात्रा काढण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी चिचपल्ली येथील एका शाळेत या यात्रेकरुंनी मुक्काम केला आहे. समारोपाला माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार सहभागी होती. यात्रेला सुरूवात करताना काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष सूर्यकांत खनके, योगानंद चंदनवार, अॅड. प्रितिषा साधना, योगानंद चंदनवार, नाहिद काजी, शरीफ गुरुजी, एजाज शेख, भूपेश रेगुंडवार, उत्तम पाल, धनंजय शास्त्रकार, कामरान अंसारी यांच्यासह चंद्रपूर शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, इंटकचे के. के. सिंह, महिला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, नंदू नागरकर, स्वाती त्रिवेदी, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अड्डुर, चित्रा डांगे, बापू अंसारी, गोपाल अमृतकर, अख्तर सिद्धिकी, दौलत चालखुरे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment