Ads

एसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात

चंद्रपूर : संवेदनशील खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख आहे. अनेकदा त्यांनी कृतीतून दाखवून देखील दिले आहे. आज देखील चिमूर आगारातील एसटी बस चंद्रपूर येथे येत होती. ताडालीजवळ टायर फुटल्याने चार तासापासून उभी होती.
चंद्रपूर येथे जात असतांना खासदार बाळू धानोरकर यांचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून प्रवाश्यांची विचारपूस केली. त्यावेळी दोन वयोवृद्ध प्रवासी उपचारासाठी ताटकळत होते. ही बाब लक्षात येताच
खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतःच्या गाडीत त्यांना चंद्रपूरला आणले. तसेच इतर प्रवाशांसाठी तत्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिली. खासदार बाळू धानोरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल प्रवासी आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment