Ads

वैनगंगा नदीत स्कार्पिओ कोसळली; चालकाचा जागीच मृत्यु

चंद्रपूर : आष्टी - गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून भरधाव वेगातील स्कार्पिओ वाहन थेट वैनगंगा नदीत कोसळली. यामध्ये वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री सहाच्या सुमारास घडली. अनमोल दुपारे असे मृतक वाहनचालकाचे नाव आहे.
Scorpio crashes in Wainganga River; The driver died on the spot
गोंडपिपरी येथून अनमोल दुपारे रा. छोटा नागपूर हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आष्टीकडे एम एच 20 डिवी 3711 क्रमांकाचे स्कार्पिओ वाहन जात होता. भरधाव असलेले वाहन आष्टीजवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून थेट नदीत कोसळले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन नदीत कोसळल्याचे कारण पुढे येत आहे. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. वेळ सायंकाळची असल्याने हे वाहन कुणाचे आहे. वाहन चालक कोण याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

वाहनात काही प्रवासी असल्याची माहिती चर्चेत होती. परंतु सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक हा एकटाच होता. अपघाताची माहिती आष्टी व गोंडपीपरी पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वाहन नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment