Ads

मुरसा येथील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्‍यांनी शेकडो कार्यकर्त्‍यांसह घेतला भाजपात प्रवेश.

चंद्रपुर : मुरसा या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्‍य आणि मोठया संख्‍येने नागरिकांनी भाजपात प्रवेश घेतला तो भाजपाच्‍या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्‍वास ठेवून. ज्‍या विश्‍वासाने त्‍यांनी भाजपात प्रवेश घेतला त्‍या विश्‍वासाला आम्‍ही कधीही तडा जावू देणार नाही. सर्वशक्‍तीनिशी आम्‍ही मुरसा गावाचा विकास करू आणि हे गांव संपूर्ण भाजपामय करू, अशी ग्‍वाही वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Sarpanch, Upasarpanch, Gram Panchayat members of Mursa joined BJP along with hundreds of workers.
दिनांक २१ ऑक्‍टोबर रोजी विश्रामगृह चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत भद्रावती तालुक्‍यातील मुरसा या गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्‍य व अनेक नागरिकांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला. शिवसेना-उध्‍दव ठाकरे यांच्‍या ताब्‍यातील ग्राम पंचायत लोकप्रतिनिधींनी भाजपात प्रवेश घेत भाजपावर विश्‍वास दर्शविला. नवप्रवेशित सर्वांचे श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी स्‍वागत केले व शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, भाजपाचे भद्रावती तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे यांच्‍यासह मुरसा येथील सरपंच सौ. सविता जमदाडे, उपसरपंच सुनिल मोरे, सदस्‍य रूपेश नवले, अनिल पोटे, मेघासी चामाटे, करिश्‍मा निब्रड, गजानन कामतवार, राजकुमार पारशिवे, सुरेंद्र साळवे, गजानन गानफाडे, कालिदास ठोंबरे, हनुमान मांढरे, संबा नवले, चंद्रशेखर बोढाले, प्रशांत गौरकार, शिवम जमदाडे, कैलास नवले, रविंद्र खरवडे, हनुमान उईके, शुभम कामतवार, गणेश पचारे, राजीव जमदाडे, प्रविण बलकी, प्रेम नांदे, दिलीप मोहुर्ले, शामराव खरवडे, कल्‍पना कोहळे, संगीता पारशिवे, इंदुबाई पचारे, सुनिता पचारे, पुष्‍पा पारशिवे, लता पिंपळशेंडे, अर्चना घोरपडे, अश्विनी कामतवार, चंद्रकला धानोरकर, स्‍मीता घोरपडे, वर्षा पारखी, रोशनी कामतवार, विद्या कामतवार, कलावती पचारे, आशा डोंगरे, मंदा गाडगे, लता कामतवार, प्रतिमा उगे, गीरजा कामतवार, लताबाई क्षीरसागर, तुळसाबाई कामतवार, कमल नागपुरे, वर्षा कामतवार, वृंदा कामतवार, रेखा मांढरे, इंदूबाई मांढरे, तीरवनाबाई येवले, शोभा पचारे, नंदा झोडे, सोनाबाई पचारे, अनिता साळवे, अर्चना पोले, पार्वती डंभारे, सविता चापले, आशा क्षीरसागर, शिला कामतवार, तेजस्विनी झोडे, विना ठेंगणे, संजिवनी शेरकी, सुमनबाई शेरकी, शैला ठोंबरे, वंदना ठेंगणे, गिरजाबाई खामनकर, लता वाकुळकर, अनिता पारखी, सविता देऊरकर, सुमित्रा मंदे, कौशल्‍या कामतवार, सुमन आत्राम, पार्वतीबाई चांभारे, रविंद्र उगे, मारोती कावळे, मारोती ठेंगणे, मारोती नवले, मनोज नवले, शामराव खरवडे, लडु पुंजाराम मडकाम, महादेव देऊरकर, संभा मत्‍ते, विलास पारखी, भारत चंदनखेडे, गणेश वाकुळकर, महेश खोकले यांची उपस्थिती होती.

यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदेमातरम् अशा घोषणांनी परिसर निनादुन गेला. मुरसा गावातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्‍या भाजपा प्रवेशामुळे या गावाचा सर्वांगिण विकासाचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment