Ads

माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभायात्रेत उसळला भक्तीचा महासागर

चंद्रपुर :- आमदार किशोर जोगेवार याच्या संकल्पनेतुन माता महाकाली भक्तगण आणि माता महाकाली सेवा समितीच्या वतीने आयोजित महाकाली महोत्सावा निमित्त निघालेल्या माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभयात्रेत भक्तीचा महासागर चंद्रपूर नगरीत उसळला. अभिलिप्सा पंडा, बाहुबली बंजरग बली, शिवगर्जना ढोल व ध्वज पथक या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
Ocean of devotion surged in Mata Mahakali Palkhi Nagar Pradakshina Parade
सायंकाळी पाच वाजता माता महाकालीच्या पूजनानंतर महाकाली मंदिर जवळुन सदर शोभायात्रेला सुरवात झाली. शोभयात्रेत सर्वात समोर असलेल्या राज्यातील प्रथक क्रमांकाच्या शिवर्गजना या युवक व युवतींच्या ढोल पथकाने सा-र्यांचे लक्ष वेधले. चंद्रपूरात प्रथमच आगमन झालेल्या बाहुबली बजरंग बली हे ही या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. हरहर शंभु गाण्याच्या सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पंडा यांच्या रोड शो नेही शोभयात्रेत भक्तीची रंगत भरली. सदर शोभयात्रेत 13 अश्व, अश्व आरुढ नवदुर्गांचे बोलके दृश्य, अश्व आरुढ राणी हिराईचे बोलके दृश्य, श्री. माता महाकालीची चांदीची मूर्ती व पादुका पालखी, अब्दागीरी व तूतारी, पोतराजे नृत्य, अश्वावर देवी देवतांचे साकारलेले बोलके दृष्य, नागपूर, चंद्रपूर, राजुरा येथील तिन ढोल ताशा पथक, दोन बॅंड पथक, गायत्री परिवाराचा 100 महिलांचा कळस समुह, 100 शंखनाथ महिलांचा समुह, १५० लोकांचे पाच लेझीम पथक, 100 महिलांचे ध्वजधारी पथक, 3 ध्वनी वादक पथक, पवनसुत प्रभु श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृष्य, पुरुष आणि महिला दांडीया समुह, योग्य नृत्य परिवारातील १०1 पुरुष महिलांचे योग नृत्य, 4 आदिवासी नृत्य, 1 लैंगी बंजारा समाज नृत्य, 100 मुला आणि मुलींचे कराटे प्रात्याक्षिक दृष्य, 80 वादकांसह जगदंब ढोल पथक, शिवाज्ञा वाद्य पथक यांच्यासह इतर धार्मीक सांस्कृतीक आणि सामाजिक देखाव्यांचा सहभागी झाले होते. शोभायात्रेत मोठा जनसागर सहभागी झाला होता.

आज सोमवार चे कार्यक्रम

माता महाकाली पुजन, माहुरगडचे प्रसिध्द बाळु महाराज यांचे श्रीमद् माता महाकाली देवी भागवत कथा, सुंदरकाड, स्त्री शक्ती या विषयावर लघु नाटिका, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक विषयावर समुह गायन व नृत्य, अकोला येथील उमेश आणि नेतल शर्मा यांची भजन संध्या

उद्या मंगळवार चे कार्यक्रम

माता महाकाली आरती, शक्ती संवर्धन, पर्यावरण संरक्षण महायज्ञ, 999 कन्या भोजन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment